मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : छत्रपतींचा अवमान करणाऱ्या नितेश राणेंचा नवा गेम हिंदू मुस्लिम दंगा घडविण्याचा - हाजी शाहनवाज खान

पनवेल : नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणारे आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मुस्लिम समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रकार केला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : छत्रपतींचा अवमान करणाऱ्या नितेश राणेंचा नवा गेम हिंदू मुस्लिम दंगा घडविण्याचा - हाजी शाहनवाज खान

पनवेल : नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणारे आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मुस्लिम समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रकार केला आहे. पनवेल तालुक्यातील उलवे येथे श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी नितेश राणे आले असता त्यांनी हिंदू समाजाला हिंदू समाजाकडेच व्यवहार करण्याची शपथ देत, मुस्लिमांना हिरवा साप ठेचण्याची भाषा केली. यावर एआयएमआयएमचे कोकण विभाग प्रभारी तथा विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र महासचिव हाजी शाहनवाज खान आक्रमक झाले आहेत. त्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर नितेश राणेंचा खरपूस समाचार घेतला.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, नितेश राणे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुर्घटना लपविण्यासाठी राज्यात हिंदू मुस्लिम समाजाच्या भावना दुखावून दंगली घडविण्याच्या तयारीत आहे. यासाठी राणे पिता पुत्रांवरील अखंड देशाचे नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळाल्यामुळे अखेर मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचा नवा डाव नितेश राणे याने आखला. यासाठी मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या रामगिरी महाराज या भोंदू बाबाचा विषय चर्चेत आल्यानंतर भाजपचा आमदार नितेश राणे याने अहमदनगर येथे जावून भोंदू बाबाची पाठराखण करत, मुसलमानांना मशिदीत घुसून मारण्याची भाषा करून दोन्ही समाजामध्ये जातीय तेढ निर्माण केला असल्याचा आरोप देखील हाजी शाहनवाज खान यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना केला.

यावेळी हाजी शाहनवाज खान यांनी दोन्ही समाजामध्ये द्वेष पसरू नये यासाठी नितेश राणे यांचे डाव जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगताना, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करून ढेकरही न देता हजम करण्याचा प्रकार केला असल्याचे सांगितले.

हेही वाचा: Yamini Jadhav : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांनी बुरख्याचे वाटप केले

शेअर करा