मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : पत्रकार उत्कर्ष समितीचे पुढील उपक्रम अधिकाधिक व्यापक व्हावेत..! मनोज सानप ठाणे जिल्हा माहिती अधिकारी

पनवेल जितिन शेट्टी : डॉ.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : पत्रकार उत्कर्ष समितीचे पुढील उपक्रम अधिकाधिक व्यापक व्हावेत..! मनोज सानप ठाणे जिल्हा माहिती अधिकारी

पनवेल जितिन शेट्टी : डॉ. अशोक म्हात्रे यांचे कार्य खूपच कौतुकास्पद असून पत्रकार उत्कर्ष समितीचे पुढील उपक्रम अधिकाधिक व्यापक व्हावेत. पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांनी काल ठाणे जिल्हा माहिती कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी आपले मत व्यक्त केले.

यावेळी पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक म्हात्रे यांनी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांना शाल व सन्मान चिन्ह भेट दिले.समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक म्हात्रे यांनी पत्रकार उत्कर्ष समितीच्या विविध कार्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांना दिली. माध्यमाचे बदलते स्वरूप बदलत्या काळात नवनवीन माध्यमांचा उपयोग याबद्दल सखोल मार्गदर्शन जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी यावेळी केले.

पत्रकार उत्कर्ष समितीच्या अंतर्गत करण्यात येत असलेल्या उपक्रमाचे मनोज सानप यांनी कौतुक केले पुढील उपक्रम अधिकाधिक व्यापक व्हावेत, डॉ. अशोक म्हात्रे यांचे कार्य खूपच कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पत्रकार उत्कर्ष समितीचे सचिव डॉ.वैभव पाटील, खजिनदार शैलेश ठाकूर, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सुधीर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा: Raigad Crime News : चौक बाजारपेठेत मटका तेजीत पोलीसांचे दुर्लक्ष! जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने मटका बंद करावा : नागरिकांची मागणी

शेअर करा