मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : पनवेलच्या काँग्रेस भवनमध्ये महाविकास आघाडीचा मेळावा .. पनवेल विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढवत आहोत - उमेदवार बाळाराम पाटील …. पनवेलची महाविकास आघाडी बाळाराम पाटील यांच्यासोबतच - काँग्रेसचे सुदाम पाटील

पनवेल : पनवेल विधानसभेची निवडणूक Panvel Vidhan Sabha Election महाविकास आघाडी म्हणूनच लढवत आहोत असे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील Balaram Patil (शेकाप) यांनी पनवेलच्या काँग्रेस भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : पनवेलच्या काँग्रेस भवनमध्ये महाविकास आघाडीचा मेळावा .. पनवेल विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढवत आहोत - उमेदवार बाळाराम पाटील …. पनवेलची महाविकास आघाडी बाळाराम पाटील यांच्यासोबतच - काँग्रेसचे सुदाम पाटील

पनवेल : पनवेल विधानसभेची निवडणूक Panvel Vidhan Sabha Election महाविकास आघाडी म्हणूनच लढवत आहोत असे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील Balaram Patil (शेकाप) यांनी पनवेलच्या काँग्रेस भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

यापुढे बोलताना बाळाराम पाटील म्हणाले,शेतकरी कामगार पक्षाला महाविकास आघाडीचा पाठिंबा याबाबत संभ्रम निर्माण केला जात होता परंतु आज काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,समाजवादी पार्टी,आम आदमी,सामाजिक संघटना यांच्या मेळाव्यातून महाविकास आघाडी एकसंध असल्याचे दाखवून दिले आहे.माझ्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे शरद पवार यांची सभा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,तशी चर्चा सुरू आहे असे बाळाराम पाटील यांनी सांगून पनवेलच्या हिताच्या दृष्टीने आघाडी म्हणून ही निवडणूक लढवत आहोत. शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवार लीना गरड यांच्या उमेदवारीबाबत विचारले असता, महाविकास आघाडीच्या भविष्याच्या वाटचालीवर परिणाम होणार नाही याची खबरदारी आम्ही घेत आहोत त्यामुळे मी शिवसेनेबद्दल काहीही बोलणार नाही असे सांगितले.पनवेलच्या स्तरावर स्थानिक प्रश्न म्हणून स्थानिक स्तरावरचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार असल्याचे सांगितले.

पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुदाम पाटील यांनी,पनवेलच्या महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांचा आज मेळावा झाला,या मेळाव्यात पनवेलची महाविकास आघाडी बाळाराम पाटील यांच्या सोबतच असून त्यांच्या प्रचारार्थ तसेच त्यांना निवडून आणण्याचा निश्चय आम्ही महाविकास आघाडीने केला आहे.आजच्या मेळाव्याला महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते एका दिलाने उपस्थित होते असे सांगितले.या मेळाव्याला शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी विशेष करून उपस्थित होते,त्यांनी ही महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.

शेअर करा