मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : पत्रकार संजय कदम यांचा सिंधुरत्न पुरस्काराने सन्मान

पनवेल जितिन शेट्टी : सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संस्था, पनवेल या आपल्या संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन पनवेल येथील फडके नाट्यगृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाले.

V
Vivek

2 मिनिट वाचन

Panvel News : पत्रकार संजय कदम यांचा सिंधुरत्न पुरस्काराने सन्मान

पनवेल जितिन शेट्टी : सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संस्था, पनवेल या आपल्या संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन पनवेल येथील फडके नाट्यगृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भगवान बिरमोळे हे समारंभाचे अध्यक्ष या नात्याने आणि शेकाप नेते प्रीतम म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणिस गणेश कडू, उद्योजक मंगेश परुळेकर, सिंधुदुर्ग येथील अभियंता अजयकुमार सर्वगौड, युवा नेते मंगेश अपराज, आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पत्रकार संजय कदम यांना सिंधुरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

याप्रसंगी रमाकांत चव्हाण व संजय साटम याना ’जीवन गौरव’ आणि पत्रकार संजय कदम journalist Sanjay Kadam याना ’सिंधुरत्न’ या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्याचबरोबर यशस्वी युवा उद्योजक स्थापत्य अभियंता संतोष पोकळे, डॉ.तन्वी बांदेकर, डॉ. आशिष बांदेकर, ऍड. अमोल गावडे आणि क्रीडा क्षेत्रात यश प्राप्त केलेल्या खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला. सचीव बाप्पा मोचेमाडकर यांनी प्रास्ताविकामधे वर्षभरात आपल्या संस्थेने राबवलेले उपक्रम आणि प्रगतीचा आढावा घेतला. नंतर उपाध्यक्ष प्रिया खोबरेकर व अध्यक्ष केशव राणे यांनी आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांनी आपल्या संस्थेला येणार्या कोणत्याही अडचणीमधे पूर्णपणे सहकार्य करण्याचे वचन दिले. नंतर अध्यक्ष डॉ. भगवान बिरमोळे यांनी आपल्या बालपणीची आठवण सांगून उपस्थितांसमोर आपले सकारात्मक आदर्श विचार मांडले. उपाध्यक्ष संतोष चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमाचा प्रारंभ श्रीगणेश पंचरत्न या स्तोत्राच्या पार्श्‍वगायनाच्या साथीने दीपप्रज्वलन करून झाला. नंतर चेतनाताई वालावलकर व सहकारी महिलांनी नांदी व स्वागतगीत सादर केले. माधव भागवत यांने तबला तर संकेत पवार यांने पखावज साथ केली. यशवंत बिड्ये बुवा यानी खंजिरीसाथ केली. आपले सभासद व पाल्यांचे विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. यामधे नव्या जुन्या, मराठी-हिन्दी गाण्यांचे करावकेवर सादरीकरण, तसेच बासरीवादन, भरतनाट्यम विविध प्रकाचे नृत्य कलाकारांनी सादर केले. ज्येष्ठ महिलांनी सादर केलेले ’बाईपण भारी देवा’ हे फ्यूजन प्रकारातील समूहनृत्य रसिक प्रेक्षकांच्या मनाला चांगलेच भावले. या गाण्यांची निवड, त्याचे दिग्दर्शन आणि ज्येष्ठ महिलांकडून कसदार तालमीने करून घेतलेला पदविन्यास या त्रिगुणी संगमासाठी नृत्यदिग्दर्शिका अदिती इंदप हिचे नक्कीच कौतुक करावे लागेल! उपाध्यक्ष प्रिया खोबरेकर व सहकारी महिलांनी सादर केलेल्या ’कोकणचो रुबाब भारी’ या मालवणी नाटकाला रसिकांनीही मनमुराद दाद दिली. प्रसन्नकुमार घागरे यांच्या संकल्पना व दिग्दर्शनाने नटलेला भव्यदिव्य वारकरी दिण्डीसोहळा कार्यक्रमाचा खास आकर्षणबिंदू ठरला. आणि या कार्यक्रमाने सोहळा रंगततेच्या सर्वोच्चपदावर गेल्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. वैभवी मराळ यांचे अभ्यासपूर्ण बहारदार निवेदन, गायकांचे भावपूर्ण गायन, नृत्यांगनांचा पदविन्यास आणि संघाची कार्यकारिणी व कार्यकर्त्यानी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी दिलेले मोलाचे योगदान या चतुःसूत्रीच्या बळावर नटलेल्या या सोहळ्याच्या सुखद स्मृती मनामधे साठवून नंतर रसिकांनी ’सात्विक’ आणि ’उन्मत्त’ अशा भोजनाचा आस्वाद घेतला.

शेअर करा