मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : सातारा काशीळ येथील शाळा इमारतीचे लोकार्पण आणि माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती

पनवेल (जितिन शेट्टी) : रयत शिक्षण संस्थेच्या सातारा तालुक्यातील काशीळ येथील यशवंत हायस्कूलच्या जीर्णोद्धारीत इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संस्थेचे संघटक डॉ.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : सातारा काशीळ येथील शाळा इमारतीचे लोकार्पण आणि माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती

पनवेल (जितिन शेट्टी) : रयत शिक्षण संस्थेच्या सातारा तालुक्यातील काशीळ येथील यशवंत हायस्कूलच्या जीर्णोद्धारीत इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सचिव विकास देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

उद्योजक अविनाश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास ॐ दत्त परिवाराचे निनादानंद महाराज, वक्ते इंद्रजित देशमुख, संस्थेचे सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे, बंडू पवार, विभागीय अधिकारी नवनाथ जगदाळे, सरपंच अर्चना कोरे, मुख्याध्यापक दीपक महापरळे, माजी विद्यार्थी भरत माने, सुरेश माने, नितीन माने, मंगेश माने, अशोक पवार, संजय जाधव अविनाश जाधव, लक्ष्मण माने, हेमंत माने आदी उपस्थित होते.

यशवंत हायस्कूलच्या इमारत डागडुजीसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यापूर्वी १० लाख रुपये देणगी दिली होती. त्याचप्रमाणे उर्वरित कामांसाठी रविवारी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी आणखी पाच लाख रुपये देणगी जाहीर केली. याबद्दल संस्था तसेच हायस्कूलच्या वतीने त्यांचा सन्मान करून आभार मानण्यात आले.

हेही वाचा: ड्रिंक ॲण्ड ड्राइव्ह करणं भोवलं; मुंबई पोलिसांकडून 11 जणांवर गुन्हे दाखल

शेअर करा