मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : लायन्स क्लब तर्फे फडके हायस्कूल शिरढोण येथे आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबीर

पनवेल : लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम आणि रिजन 3 मधील सर्व क्लबच्या वतीने शिरढोण येथील वासुदेव बळवंत फडके हायस्कूल येथे भव्य आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : लायन्स क्लब तर्फे फडके हायस्कूल शिरढोण येथे आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबीर

पनवेल : लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम आणि रिजन 3 मधील सर्व क्लबच्या वतीने शिरढोण येथील वासुदेव बळवंत फडके हायस्कूल येथे भव्य आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन प्रांतपाल एन आर परमेश्वरन तसेच विशेष अतिथी म्हणून विजय गणात्रा, ए एस एन मूर्ती उपस्थित होते. या शिबिराचा 315 विद्यार्थी, पालक आणि कर्मचारी यांनी लाभ घेतला. 22 जणांना चष्मे देण्यात आले. आरोग्य तपासणीसाठी अपोलो हॉस्पिटलची टीम तर नेत्र तपासणीसाठी लुईस कोलासो आणि निक्सन कोलासो यांनी सहकार्य केले.

या शिबिरासाठी रिजन चेअरमन सुयोग पेंडसे, झोन चेअरमन अलकेश शहा, संजय गोडसे, मिलिंद पाटील, नयन कवळे, पनवेल सरगम क्लबच्या अध्यक्ष मानदा पंडित, सचिव प्रेमेंद्र बहिरा, आदित्य दोशी उलवे जेम्स क्लबचे उमेश जाधव उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुर्यवंशी सर आणि सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

हेही वाचा: किडवाई पोलिसांची कारवाई ; मुंबई 1993 दंगलीतील फरार आरोपीला अटक..

शेअर करा