मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : पनवेलमध्ये गुटखा आणि अमली पदार्थांची विक्री जोरात; BJP कार्यालयाजवळील पान टपरीवर कारवाईचा प्रश्नचिन्ह

पनवेल : पनवेलमधील तक्का परिसरात सुनील बहिरा यांच्या BJP कार्यालयालगत असलेल्या एका पान टपरीवर गुटखा आणि अमली पदार्थांची उघडपणे विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : पनवेलमध्ये गुटखा आणि अमली पदार्थांची विक्री जोरात; BJP कार्यालयाजवळील पान टपरीवर कारवाईचा प्रश्नचिन्ह

पनवेल : पनवेलमधील तक्का परिसरात सुनील बहिरा यांच्या BJP कार्यालयालगत असलेल्या एका पान टपरीवर गुटखा आणि अमली पदार्थांची उघडपणे विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून, या बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई कोण करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या पान टपरीवर बेकायदेशीररित्या गुटख्यासह अन्य नशायुक्त पदार्थांची विक्री सर्रास सुरू आहे. यामुळे परिसरातील तरुणांवर वाईट परिणाम होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, हे दुकान BJP कार्यालयाच्या अगदी जवळ असल्याने प्रशासन आणि संबंधित यंत्रणांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.स्थानिकांनी याबाबत त्वरित कारवाईची मागणी केली असून, पोलिस आणि प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. "हा प्रकार गंभीर आहे. जर त्वरित कारवाई झाली नाही, तर याचे दुष्परिणाम समाजावर होऊ शकतात," असे एका स्थानिक नागरिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. प्रशासन आणि पोलिस यंत्रणा यावर कोणती कारवाई करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जोपर्यंत ठोस पावले उचलली जात नाहीत, तोपर्यंत या बेकायदेशीर धंद्याला आळा बसणार नसल्याची चिंता नागरिक व्यक्त करत आहेत.

हेही वाचा: Navi Mumbai Crime News : 'ऑनलाइन' वेश्याव्यवसायाचे रॅकेट उद्ध्वस्त : तीन फरार आरोपींना पश्चिम बंगालमधून जेरबंद!

शेअर करा