मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : युवा ग्रामिण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी भूषण साळुंखे

पनवेल : दैनिक भास्करचे रायगड जिल्हा प्रतिनिधी भूषण साळुंखे यांची युवा ग्रामिण पत्रकार संघाच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : युवा ग्रामिण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी भूषण साळुंखे

पनवेल : दैनिक भास्करचे रायगड जिल्हा प्रतिनिधी भूषण साळुंखे यांची युवा ग्रामिण पत्रकार संघाच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. युवा ग्रामिण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे पत्रकार भूषण साळुंखे यांची रायगड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांसह विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांनी रायगड आणि नवी मुंबईतील सर्वच उमेदवारांच्या गाठीभेटी घेवून आपल्या पत्रकारितेचा ठसा जोमाने उमटविला आहे, त्यांना जिल्ह्यातील पत्रकारांशी प्रदीर्घ अशा स्वरूपाचा परिचय आहे. पत्रकार भूषण साळुंखे यांनी सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा, कृषी तसेच राजकारणी विषयावर नेहमी समाजोपयोगी बातम्या प्रकाशित केल्या आहेत. रायगड जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याबद्दल जिल्ह्यात युवा ग्रामीण पत्रकार संघटना अधिक मजबूत करेन व ग्रामिण भागातील पत्रकारांना युवा ग्रामिण पत्रकार संघटनेशी एकनिष्ठ जोडण्याची प्रतिक्रिया भूषण साळुंखे यांनी दिली.

भूषण साळुंखे यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय युवा ग्रामिण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांना दिले आहे. तसेच नव्याने पनवेल तालुक्याच्या कमिटीची अधिकृत घोषणा ते लवकरच जाहीर करणार असून रायगड जिल्ह्याच्या कमिटीचीही ते बांधणी करण्यासाठी सरसावले असल्याची माहिती त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

हेही वाचा: Panvel Crime News : पनवेल महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड: प्रभाग अधिकाऱ्यांचा बेशरम कारभार उघडकीस!

शेअर करा