मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel Crime News : पनवेलमध्ये बिंगो जुगार जोमात; ऐन आचार संहिता काळात देखील पोलिसांच्या डोळ्यादेखत जुगार होता सुरूच

पनवेल जितिन शेट्टी :-

V
Vivek

2 मिनिट वाचन

Panvel Crime News

पनवेल जितिन शेट्टी :-

Panvel Crime News : पनवेल शहरातील खांदा कॉलनी येथील सेक्टर १० मध्ये एका इमारततीच्या दुकान गळ्यामध्ये बिंगो जुगार अड्डा जोमाने सुरूच आहे. Panvel Jugar Adda in Khanda Colony ऐन विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता असतानाही खांदेश्वर पोलिसांच्या डोळ्यादेखत हा बेकायदेशीर जुगार सुरूच होता. सदर जुगार अड्डा बंद करण्याबाबत खांदेश्र्वर पोलिसात तक्रार अर्ज सादर करून देखील हा जुगाराचा धंदा आचार संहितेमध्ये सुरूच ठेवण्याचा पराक्रम खांदेश्र्वर पोलीसांच्यावतीने आणि त्यांच्या आशीर्वादाने मोकाटपणे सुरूच ठेवण्यात आला. Panvel Police Latest News

याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ - २ चे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या देखील कानावर सदर बाब टाकण्यात आली असून सदर जुगार अड्ड्यावर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांमार्फत देण्यात आले. मात्र सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या आदेशाला झुगारून खांदेश्वर पोलीस Khandeshvar Police Station अशा जुगार धंद्यांना पाठबळ देताना दिसत आहेत. याठिकाणी खालील खान हे सदरचा धंदा चालवीत असून त्यांचे परिमंडळ - २ मध्ये इतरही ठिकाणी कामोठे, खांदा कॉलनी वैगेरे अशा प्रकारचे जुगार अड्डे सुरू आहेत. शहरामध्ये तरुणांना जुगाराकडे वळवून देशाचं भवितव्य असणाऱ्या युवा पिढीला बरबाद करण्याचे काम या जुगार अड्ड्यांमुळे होत असल्याने याठिकाणी कारवाई होणे गरजेचे आहे, तसेच सदर अवैध धंदे हे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने दिलेल्या तक्रार अर्जामध्ये करण्यात आली आहे. Panvel Police Latest News

सदरचा दुकान गाळा बाहेरून बंद करण्यात येत असला तरी आत ऑनलाईन बिंगो जुगार हा धंदा सुरू असतो. भिंतीवर जवळपास ७ ते ८ मशीन लावण्यात आल्या आहेत. त्यावर अनेक जण जुगार खेळत असतात. व्हिडिओ पार्लर चालविणाऱ्या खालील खान यांच्यामार्फत दिवसाढवळ्या करोडो रुपयांचा व्यवहार केला जात आहे. त्यामुळे युवा पिढीला वाचविण्यासाठी नवीमुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील बिंगो जुगार कायमचे बंद करण्यात यावेत, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली असून पोलीस प्रशासन मात्र याबाबत कारवाई करण्यासाठी धजावत आहेत, असेच चित्र सध्या समोर आले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ -१ आणि परिमंडळ - २ मधील तरुणाई बिघडविणारे अवैध धंदे बंद करण्यासाठी वेळी उपोषणाचे हत्यार उपसले जाण्याची तयारी पत्रकार सुरक्षा समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. Panvel Police Latest News

हेही वाचा: Navi Mumbai Police : नवी मुंबईत बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या 4 बांगलादेशी नागरिकांना अटक

शेअर करा