मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel Cha Raja Agman: पनवेलमध्ये सर्वांचे आकर्षण मार्केटचा राजा विराजमान आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सपत्नीक पूजन

पनवेल : पनवेल येथील महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेच्या वतीने गौरा गणेशोत्सवानिमित्त लालबागच्या राजाची प्रतिकृती Panvel Cha Raja Agman पनवेलमध्ये विराजमान झाली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel Cha Raja Agman: पनवेलमध्ये सर्वांचे आकर्षण मार्केटचा राजा विराजमान आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सपत्नीक पूजन

पनवेल : पनवेल येथील महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेच्या वतीने गौरा गणेशोत्सवानिमित्त लालबागच्या राजाची प्रतिकृती Panvel Cha Raja Agman पनवेलमध्ये विराजमान झाली आहे. या मार्केटच्या राजाचे पूजन आमदार प्रशांत ठाकूर आणि Prashant Tahkur त्यांच्या सुविद्य पत्नी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते आज (दि. २१) करण्यात आले. या वेळी त्यांनी गणरायाचे मनोभावे दर्शन घेत जनतेच्या सुख, समृद्धी आणि शांतीचा मार्ग सुलभ व्हावा, अशी प्रार्थना केली.

या गौरा गणेशोत्सवाचे यंदाचे ३२वे वर्ष असून सामाजिक बांधिलकी जोपासून हा उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात लाखोंच्या उपस्थितीत शांततामय साजरा केला जात असल्याचे महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेचे अध्यक्ष एस.के. नाईक यांनी या वेळी सांगितले. त्यांच्यासमवेत गौरा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद नाईक, सचिव दिलीप अनभुले, इतर पदाधिकारी, सदस्य आणि भाविक उपस्थित होते. सर्वांचे आकर्षण असलेल्या या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी होत असते.

हेही वाचा: Panvel Lalbhaug Cha Raja : पनवेलकरांना घडणार लालबागच्या राजाचे दर्शनमहात्मा ज्योतीबा फुले हातगाडी संघटना गौरा गणेश उत्सवाचे ३२ वे वर्ष

शेअर करा