मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pandurang Sakpal Passed Away : कट्टर शिवसैनिकांचे दुःखद निधन.. ठाकरेंना धक्का

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी विभाग प्रमुख Pandurang Sakpal यांचे शनिवारी अल्पशाः आजाराने निधन

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pandurang Sakpal Passed Away : कट्टर शिवसैनिकांचे दुःखद निधन.. ठाकरेंना धक्का

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी विभाग प्रमुख Pandurang Sakpal यांचे शनिवारी अल्पशाः आजाराने निधन

मुंबई :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण मुंबईचे माजी विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांचे शनिवारी अल्पशाः आजाराने निधन झाले आहे. एक कट्टर शिवसैनिक म्हणून पांडुरंग सकपाळ यांची दक्षिण मुंबईत ओळख होती. वयाच्या 61 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर गिरगाव येथील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पांडुरंग सकपाळ यांच्या निधनामुळे ठाकरे गटावर शोककळा पसरली आहे.

संजय राऊत यांनी व्यक्त केला शोक
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सकपाळ यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. "पांडुरंग सकपाळ. धग धगता कडवट शिवसैनिक. दक्षिण मुंबई गिरगाव भागात त्याने विभाग प्रमुख म्हणून कार्याचा ठसा उमटवला. अनेक आंदोलनात पोलिसांचा मार खाल्ला. तुरुंग भोगला. पण पांडुरंग मागे हटला नाही. पांडू म्हणूनच तो लोकप्रिय होता. असा झुंजार पांडू आम्हाला सोडून गेला. विनम्र श्रद्धांजली", अशा भावना संजय राऊत यांनी व्यक्त केल्या आहेत.

2019 मध्ये पांडुरंग सकपाळ यांनी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. अजान स्पर्धा आयोजित केल्यामुळे पांडुरंग सकपाळ यांच्यावर बरीच टीका झाली होती. पांडुरंग सकपाळ यांनी 2019 मध्ये मुंबादेवी मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. याशिवाय, महाविकास आघाडीच्या महामोर्चाची मुख्य जबाबदारी देखील पांडुरंग सकपाळ यांनी सांभाळली होती.

हेही वाचा: Mumbai Railway Mega Block : रेल्वेचा रविवारी मध्य, पश्चिम, हार्बर तिन्ही मार्गा मेगाब्लॉक

शेअर करा