मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Palghar News : गोळीच्या आवाजाने होमस्टे हादरलं! पालघरमध्ये ,17 वर्षांच्या मुलीला गळ्यात गोळी

•' डेट'साठी आले होते दोघं, पण क्षणात प्रेमकहाणीच झाली रक्तबंबाळ

V
Vivek

1 मिनिट वाचन

Palghar News : गोळीच्या आवाजाने होमस्टे हादरलं! पालघरमध्ये ,17 वर्षांच्या मुलीला गळ्यात गोळी

•'डेट'साठी आले होते दोघं, पण क्षणात प्रेमकहाणीच झाली रक्तबंबाळ

पालघर :- पालघर जिल्ह्यातील केलवा परिसरात घडलेली ही घटना संपूर्ण परिसराला हादरवणारी आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्याच प्रियकराकडून चुकून गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. एकमेकांशी वेळ घालवण्यासाठी हे दोघं 'राऊत रेसिडेन्सी' या होमस्टेमध्ये आले होते. पण अवघ्या काही क्षणात सगळं बदललं… गोळीची एक दणकट आवाज, आणि मुलगी रक्ताच्या थारोळ्यात!

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, 18 वर्षीय प्रियकराकडे अवैध पिस्तूल होतं. मुलगी त्या पिस्तुलाकडे आकर्षित झाली होती. बिनधास्तपणे ती हाताळत असताना अचानक ट्रिगर दाबला गेला आणि गोळी थेट तिच्या गळ्यात घुसली. गंभीर जखमी झालेल्या मुलीला तत्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, तिची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. नंतर तिला बोईसरमधील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार केलवा येथील 'राऊत रेसिडेन्सी' या होमस्टेमध्ये घडला. मुलगी सध्या बोईसर येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत असून तिची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी आरोपी मुलास अटक केली असून त्याच्यावर अपहरण, खुनाचा प्रयत्न, तसेच शस्त्र कायद्यांतर्गत (आर्म्स अ‍ॅक्ट) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांनी सांगितले की, आरोपीकडे अनधिकृत पिस्तूल होते. ती पाहताना उत्सुकतेपोटी मुलीने ती हाताळायला सुरुवात केली आणि अचानक ट्रिगर दाबला गेला. गोळी थेट गळ्यात घुसली. पोलिसांनी तातडीने होमस्टेला धाव घेऊन मुलीला रुग्णालयात हलवले. बंदूक जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे.

या प्रकरणात संबंधित होमस्टेने अल्पवयीन व्यक्तींसंबंधित नियमांचे पालन केले का, याची चौकशीही सुरू आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलीकडून बंदुकीच्या माहितीसंदर्भात आधीपासून काही माहिती होती का, तसेच ती बंदूक यापूर्वी वापरण्यात आली होती का, याचाही तपास सुरू आहे.

हेही वाचा: Osmanabad Name Changes : ऐतिहासिक नावात बदल, नवीन ओळख देणार ;'उस्मानाबाद' होणार 'धाराशिव'

शेअर करा