मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Palghar Bribe News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची वाड्यात कारवाई, 'उमेद' अभियानातील अधिकारी 'एसीबी' च्या जाळ्यात

Palghar Latest ACB News : मानधनाच्या चेकसाठी लाच मागणाऱ्या महिला अधिकाऱ्यास रंगेहात पकडले

V
Vivek

1 मिनिट वाचन

ACB Trap News: “A deal of ten thousand… and a village servant in the trap!”

Palghar Latest ACB News : मानधनाच्या चेकसाठी लाच मागणाऱ्या महिला अधिकाऱ्यास रंगेहात पकडले

पालघर :- उमेद अभियानांतर्गत काम करणाऱ्या एका महिला लोकसेविकेला पालघर लाचलुचपत प्रतिबंधक Palghar ACB Trap News विभागाने (एसीबी) 10,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. ही कारवाई वाडा येथील तालुका अभियान व्यवस्थापन कार्यालयात करण्यात आली असून, आरोपी महिला अधिकाऱ्याने मानधन काढून दिल्याबद्दल ही लाच स्वीकारली. Palghar Latest Bribe News

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, एका 32 वर्षीय महिला तक्रारदार या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 'उमेद' योजनेत समुदाय व्यक्ती म्हणून मानधनावर काम करतात. त्यांना केलेल्या कामाचे 19,800 रुपयांचे मानधन मिळाले होते. मात्र, मानधनाचा चेक दिल्यानंतर त्यातील 10,000 रुपये लाच म्हणून देण्याची मागणी उमेद कार्यालयातील प्रभाग समन्वय अधिकारी रेणुका रणवीर आत्राम (वय 30) यांनी केली होती.

तक्रारदार महिलेने लाच देण्यास नकार देत 4 ऑगस्ट 2025 रोजी एसीबीच्या पालघर युनिटकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे 11 ऑगस्ट 2025 रोजी पडताळणी करण्यात आली, ज्यात आरोपीने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच दिवशी सापळा रचण्यात आला.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे आणि संजय गोविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा पथकात पोलीस उप-अधीक्षक दादाराम करांडे, पोलीस निरीक्षक राकेश डांगे यांच्यासह पोलीस हवालदार विलास भोये, योगेश धारणे, नवनाथ भगत, प्रकाश दळवी आणि पोलीस अंमलदार गीता कहार, आकाश लोहारे, जितेंद्र गवळे यांचा समावेश होता.

शेअर करा