मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

कीड व्यवस्थापनावर डिजिटल शेतीशाळेचे आयोजन

दिनांक १५ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

कीड व्यवस्थापनावर डिजिटल शेतीशाळेचे आयोजन

दिनांक १५ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे

पुणे: ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान’ अंतर्गत सुरु असलेल्या विशेष डिजिटल शेतीशाळा मालिकेतील तिसरे सत्र बुधवार दिनांक १५ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे.

कृषी विभाग, पानी फाउंडेशन आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या शेतीशाळेत ‘पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. शाश्वत शेतीकडे वाटचाल करताना कीड व्यवस्थापनात पर्यावरणपूरक उपायांचा अवलंब महत्त्वाचा ठरत आहे. पक्षी थांबे, चिकट सापळे, कामगंध सापळे, तसेच मित्र कीटकांचे संवर्धन यांसारख्या उपायांद्वारे कीड नियंत्रण कसे साधता येईल, यावर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून उत्पादन खर्चात बचत आणि मृदास्वास्थ्य जपण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
दरम्यान, या मालिकेतील पहिल्या दोन डिजिटल शेतीशाळांना राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ३ एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या सत्रात पेरणीपूर्व तंत्रज्ञान, बेड तयार करणे, बेडवर टोकण करणे, शून्य मशागत करणे, आंतरपीक पद्धती, बीज उगवण क्षमता चाचणी आणि बीजप्रक्रिया यावर मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रात ८५ हजारहून अधिक शेतकरी सहभागी झाले होते. ८ एप्रिल रोजीच्या दुसऱ्या सत्रात जैविक व नैसर्गिक निविष्ठा उत्पादनावर भर देत बीजामृत, जीवामृत, घन जीवामृत, लिंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्क तयार करण्याच्या पद्धतींचे मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये १ लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. चौथी शेतीशाळा २२ एप्रिल रोजी भात शेतीसाठी सुधारित लागवड तंत्रावर होणार आहे.
या सत्रांमध्ये कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा सहभाग, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तत्काळ मिळणारी उत्तरे आणि प्रयोगशील शेतकऱ्यांनी मांडलेले प्रत्यक्ष अनुभव यामुळे संवादात्मक व उपयुक्त अशी शिकण्याची प्रभावी प्रक्रिया घडताना दिसून आली आहे.
सर्व सत्रांचे थेट प्रक्षेपण कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, आणि पानी फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर लाईव्ह प्रक्षेपित होणार आहे. शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषी क्षेत्रातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

Organizing a digital farm school on pest management

शेअर करा