मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

"राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह" निमित्त मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-2 यांच्याकडून विद्यार्थी, शिक्षक, रिक्षा चालक, पादचारी यांना केले वाहतुकीच्या नियमाचे पालन करण्याचे केले आवाहन

• 35 वे रस्ता सुरक्षा अभियान-2025, अंतर्गत मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाकडून वाहतूक शाखा यांच्याकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध मार्गदर्शन

V
Vivek

1 मिनिट वाचन

"राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह" निमित्त मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-2 यांच्याकडून विद्यार्थी, शिक्षक, रिक्षा चालक, पादचारी यांना केले वाहतुकीच्या नियमाचे पालन करण्याचे केले आवाहन

•35 वे रस्ता सुरक्षा अभियान-2025, अंतर्गत मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाकडून वाहतूक शाखा यांच्याकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध मार्गदर्शन

नालासोपारा :- मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व परिमंडळाच्या अंतर्गत 35 व्या रस्ता सुरक्षा अभियान-2025 निमित्ताने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. शंकर इंदलकर (म.पो.से) सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतुक अनुषंगाने परिमंडळ-2 वाहतूक शाखा वसई यांच्याकडून नालासोपारा पूर्व भागातील के एम पी डी हायस्कूल,सेंट विलन्ब्रॉड व सेंट ॲन्थोनी स्कूल येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी वाहतुक शाखा, वसई, पोलीस उप निरिक्षक महेबुब रिवाज तडवी व वाहतुक शाखेचे अंमलदार यांनी शाळेचे विद्यार्थी, शिक्षक वर्ग यांना वाहतुकीचे नियम, रस्त्यांवर होणारे अपघात टाळणेकरिता शाळेत जाताना-येताना घ्यावयाची काळजी, स्कुलमध्ये येणे-जाणे करिता असलेले शाळेची बस अथवा खाजगी वाहन यांनी मुलांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी याबद्दल सुचना व मार्गदर्शन करण्यात आले आहे.

छायाचित्रे · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶

पोलिसांच्या वतीने नालासोपारा येथे जनजागृती कार्यक्रम आयोजीत करून नागरिकांना वाहतुक नियम व सुरक्षा या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या.शाळकरी मुलांनी वाहतूक नियम जनजागृतीमध्ये सहभाग घेतला. परिमंडळ-2 वाहतुक विभागातर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त रिक्षाचालक आणि पादचारी नागरिकांना वाहतूक नियम व सुरक्षेच्या अनुषंगाने सर्व सूचना दिल्या गेल्या.

शेअर करा