मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Noel Tata : नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष, सर्वानुमते घेतलेला निर्णय

Noel Tata Appointed as Chairman of TATA Trusts: रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टची कमान नोएल टाटा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Noel Tata : नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष, सर्वानुमते घेतलेला निर्णय

Noel Tata Appointed as Chairman of TATA Trusts: रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टची कमान नोएल टाटा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. टाटा समूहाची मूळ कंपनी टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टची स्वतःची 66 टक्के भागीदारी आहे.

मुंबई :- नोएल टाटा यांना टाटा Noel Tata ट्रस्टचे नवे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. दिवंगत रतन टाटा यांच्या निधनानंतर ही जबाबदारी नोएल टाटा Chairman of TATA Trusts यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.रतन टाटा यांच्याकडे 1991 मध्ये टाटा समूहाची जबाबदारी सोपवण्यात आली तेव्हा ते टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदावर विराजमान होते. पण आता टाटा ट्रस्टने एकमताने ही कमान नोएल टाटा यांच्याकडे सोपवली आहे. नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ असून ते गेल्या 40 वर्षांपासून टाटा समूहाशी संबंधित आहेत.

टाटा ट्रस्टच्या कामकाजात नोएल टाटा यांनी अतिशय सक्रिय भूमिका बजावली आहे. सध्या ते टाटा ट्रस्ट अंतर्गत येणाऱ्या सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत.ही ट्रस्ट केवळ टाटा समूहाच्या परोपकारी उपक्रमांचे व्यवस्थापन करत नाही, तर टाटा समूहाची मूळ कंपनी असलेल्या टाटा सन्समध्येही टाटा ट्रस्टचा 66 टक्के हिस्सा आहे.

नोएल टाटा हे टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर आहेत. ते टाटा समूहाच्या रिटेल कंपनी ट्रेंट, टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि टाटा स्टील आणि टायटनचे उपाध्यक्ष देखील आहेत.ट्रेंट यांच्या कार्यकाळातील यशाची सर्वत्र चर्चा आहे. ट्रेंटचे मार्केट कॅप 2.93 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. नोएल टाटा हे ऑगस्ट 2010 ते नोव्हेंबर 2021 पर्यंत टाटा इंटरनॅशनल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक होते आणि त्यांच्या कार्यकाळात कंपनीची उलाढाल $500 दशलक्ष वरून $3 अब्ज झाली.

हेही वाचा: Sanjay Raut : अमित शहा हे फडणवीस पेक्षा मुख्यमंत्रीच्या जास्त प्रेमात ; खासदार संजय राऊत

शेअर करा