मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nitesh Rane : "साप" म्हणणं महागात; नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ!

Sanjay Raut On Nitesh Rane : संजय राऊत यांच्या मानहानी प्रकरणी मुंबई न्यायालयाचा नितेश राणे यांच्या विरोधात गैरजामीनपात्र वॉरंट

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut

Sanjay Raut On Nitesh Rane : संजय राऊत यांच्या मानहानी प्रकरणी मुंबई न्यायालयाचा नितेश राणे यांच्या विरोधात गैरजामीनपात्र वॉरंट

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी केलेल्या मानहानीच्या तक्रारीवरून मंत्री आणि भाजप आमदार नितेश राणे Nitesh Rane यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी ( 26 जून) मुंबईतील न्यायालयाने राणे यांच्या विरोधात थेट गैरजामीनपात्र वॉरंट जारी केलं.

या प्रकरणात यापूर्वी देखील राणे यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांनी वारंवार अनुपस्थिती दर्शवली. दोन जून रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान त्यांनी न्यायालयात स्थायी गैरहजेरीसाठी अर्ज सादर केला होता. तरीही न्यायालयाने या वर्तनाची गंभीर दखल घेत वॉरंट काढले आहे.

मुळ प्रकरण मे 2023 मधील आहे. त्यावेळी नितेश राणे यांनी एका मुलाखतीदरम्यान संजय राऊत यांचा उल्लेख 'साप' असा करत, त्यांनी जून महिन्यापर्यंत ठाकरे गट सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (एनसीपी) प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता. या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या संजय राऊत यांनी राणे यांच्या विरोधात मानहानीची तक्रार न्यायालयात दाखल केली होती.

शेअर करा