मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

NILESH RANE : निलेश राणे यांचा मंत्री छगन भुजबळ यांना इशारा

NILESH RANE ON CHHAGAN BHUJBAL : छगन भुजबळ यांना आवरलं पाहिजे…..

V
Vivek

1 मिनिट वाचन

NILESH RANE ON CHHAGAN BHUJBAL

NILESH RANE ON CHHAGAN BHUJBAL : छगन भुजबळ यांना आवरलं पाहिजे….. बीजेपीला डिवचत….निलेश राणे

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पदाधिकारी मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ CHHAGAN BHUJBAL यांनी विधानसभेच्या जागावाटपाबाबत केलेल्या एका विधानावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. विधानसभेला महायुतीमध्ये योग्य वाटा मिळाला पाहिजे. लोकसभेसारखी विधानसभेला खटपट नको असे विधान करत मंत्री छगन भुजबळ CHHAGAN BHUJBAL यांनी महायुतीला घरचा आहेर दिला होता. त्यानंतर महायुतीमध्ये आता विधानसभेवरून मिठाचा खडा पडणार का प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच छगन भुजबळ यांच्या या विधानावर नीलेश राणे NILESH RANE यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "छगन भुजबळांना आवरा, वयाचा आदर करतो, पण उठसूट काहीही बोललेलं सहन करणार नाही असे म्हणत नीलेश राणे यांनी छगन भुजबळ यांना इशारा दिला आहे.

नीलेश राणे यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. ते म्हणाले, "छगन भुजबळांना आवरलं पाहिजे…मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं???
मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही, नेहमी नेहमी भुजबळ हे बीजेपीला डिवचत असतात ही त्यांची भूमिका बरोबर नाही.
आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसंच पाहिजे, युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही.
आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो पण उठ सूट कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणार नाही कारण भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली आहे.

मंत्री छगन भुजबळ काय म्हणाले?

एका कार्यक्रमात बोलतांना भुजबळ म्हणाले होते, "एक निवडणूक झाली. आता यापुढे महायुतीत आपल्याला योग्य तो वाटा मिळाला पाहिजे. महायुतीमध्ये सामील होताना आपल्याला 80 ते 90 जागा मिळतील असे सांगितले होते. आता तेवढ्या 80 ते 90 जागा मिळाल्या तर 50, 60 निवडून येतील", असे भुजबळ म्हणाले होते.

हेही वाचा: Bomb Threat : दिल्ली-वाराणसी इंडिगो फ्लाइटला बॉम्बची धमकी, सर्व प्रवाशांना बाहेर काढले

Web Title : NILESH RANE : Nilesh Rane's warning to minister Chhagan Bhujbal

शेअर करा