मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : वीज क्षेत्रातील सुरक्षिततेसाठी सीईए नियमांचीप्रभावी अंमलबजावणी आवश्यक

Pune News : महाराष्ट्र मिरर पुणे : देशातील वीज व्यवस्थेची सुरक्षितता, विश्वासार्हता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या नियम व तांत्रिक मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यावश्यक असल्याचे मत वीज क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

वीज क्षेत्रातील सुरक्षिततेसाठी सीईए नियमांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
महापारेषण व केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या संयुक्त कार्यशाळेत तज्ज्ञांचा सल्ला

Pune News : महापारेषण व केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या संयुक्त कार्यशाळेत तज्ज्ञांचा सल्ला

Pune News : महाराष्ट्र मिरर पुणे : देशातील वीज व्यवस्थेची सुरक्षितता, विश्वासार्हता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या नियम व तांत्रिक मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यावश्यक असल्याचे मत वीज क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले.
केंद्रीय विद्युत प्राधिकरण, भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात केंद्रीय विद्युत प्राधिकरण नियम व तांत्रिक मानकांवरील प्रादेशिक स्तरावरील एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत पश्चिम विभागातील विविध राज्यांतील वीज कंपन्या, सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील वीज उपक्रम, तज्ज्ञ आणि अधिकारी अशा सुमारे दीडशे प्रतिनिधींनी सहभाग घेतला. https://maharashtramirror.com/ Pune News
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे सदस्य (थर्मल), सदस्य (ई अँड सी) व भारत सरकारचे पदसिद्ध अतिरिक्त सचिव प्रवीण गुप्ता हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महापारेषणचे संचालक (संचलन) सतीश चव्हाण आणि संचालक (प्रकल्प) दत्तात्रय पडळकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रवीण गुप्ता यांनी केंद्रीय विद्युत प्राधिकरण नियमांचा मुख्य उद्देश भारतीय वीज ग्रिडची सुरक्षितता, विश्वासार्हता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करणे हा असल्याचे सांगितले. या कार्यशाळेचा उपयोग वीज क्षेत्रातील अधिकारी व अभियंत्यांनी नियमांची सखोल माहिती करून घेण्यासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.https://maharashtramirror.com/ Pune News
महापारेषणचे संचालक (संचलन) सतीश चव्हाण यांनी महापारेषणच्या पारेषण व्यवस्थेची माहिती देताना नवीकरणीय ऊर्जा ग्रिडमध्ये समाविष्ट करण्यासाठी पारेषण जाळ्याचा सातत्याने विकास करण्यात येत असल्याचे सांगितले. संचालक (प्रकल्प) दत्तात्रय पडळकर यांनी महाराष्ट्रातील सुरू असलेल्या पारेषण प्रकल्पांची माहिती देत, प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी आणि ग्रिडचे सुरळीत संचलन यासाठी केंद्रीय विद्युत प्राधिकरण नियमांचे महत्त्व अधोरेखित केले. एल. के. एस. राठोड यांनी ग्रिडची सुरक्षितता, विश्वासार्हता आणि नवीकरणीय ऊर्जेचे एकत्रीकरण यासाठी केंद्रीय विद्युत प्राधिकरण तांत्रिक मानकांची सक्रिय अंमलबजावणी आवश्यक असल्याचे सांगितले.

शेअर करा