मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

कल्याणमध्ये भूमाफियाची नवी क्लृप्ती : बनावट सुधारित बांधकाम परवानगीने पालिका-शासनाला फसवले

भूमाफिया सलमान डोलारे याच्यावर वर्षभरात फसवणुकीचे अनेक गुन्हे; यापूर्वीही बेकायदा बांधकामाचे आरोप

V
Vivek

1 मिनिट वाचन

कल्याणमध्ये भूमाफियाची नवी क्लृप्ती : बनावट सुधारित बांधकाम परवानगीने पालिका-शासनाला फसवले

  • भूमाफिया सलमान डोलारे याच्यावर वर्षभरात फसवणुकीचे अनेक गुन्हे; यापूर्वीही बेकायदा बांधकामाचे आरोप
  • कल्याण :- कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील 'क' प्रभाग कार्यालयाच्या अंतर्गत बैलबाजार परिसरात एका सहा मजली गृहसंकुलाची बनावट सुधारित बांधकाम परवानगी तयार करून भूमाफियाने पालिका प्रशासन आणि शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पालिकेच्या नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    भूमाफियावर गुन्हा दाखल

    सलमान अनिस डोलारे (वय 42, रा. मरियम टॉवर, दूधनाका, कल्याण) असे गुन्हा दाखल झालेल्या भूमाफियाचे नाव आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे यांच्या तक्रारीनुसार, डोलारे यांच्याविरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार करणे अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    नेमका प्रकार काय?

    पालिकेच्या नगररचनाकाराने दिलेल्या तक्रारीनुसार, सन 2023 मध्ये सलमान डोलारे यांनी बैलबाजार येथील एका नवीन इमारतीच्या बांधकाम संदर्भात सुधारित बांधकाम परवानगीची कागदपत्रे 'क' प्रभाग कार्यालयात दाखल केली होती. या कागदपत्रांवर पालिकेच्या नगररचना विभागाने दिलेला मंजुरी क्रमांक आणि तारीख नमूद होती. ही इमारत तळमजला (Stilt) आणि सहा माळे अशी प्रस्तावित होती.

    परंतु, 'क' प्रभाग कार्यालयातील तत्कालीन अधिकाऱ्यांनी ही कागदपत्रे पडताळणीसाठी नगररचना विभागाकडे पाठवली असता, धक्कादायक बाब समोर आली. या कागदपत्रांवर नमूद असलेला मंजुरी क्रमांक नगररचना विभागाच्या अभिलेखात (Records) उपलब्ध नव्हता. सलमान डोलारे यांना अशा प्रकारची कोणतीही सुधारित बांधकाम परवानगी पालिकेने दिलीच नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

    डोलारे यापूर्वीही वादात

    भूमाफिया सलमान डोलारे याच्यावर गेल्या वर्षभरात अनेक गुन्हे दाखल आहेत. घर खरेदीत फसवणूक केल्याबद्दल पालिका सेवेतील एका कर्मचाऱ्यासह इतरांनी त्याच्यावर बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तसेच, पालिकेच्या बागेसाठी आरक्षित भूखंडावर बेकायदा इमारत उभारल्याप्रकरणीही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणांचा तपास सध्या ठाणे गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

    हेही वाचा: Navi Mumbai News : बिवलकर 5000 कोटी जमीन घोटाळा : 'पोलिसांवर वरून दबाव' - रोहित पवारांचा गंभीर आरोप

    शेअर करा