Pune News : पाचवी राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत नीरज उपांत्य फेरीत
Pune News : पुणे /सांगली: पुण्याच्या नीरज नांदेडे याने पाचव्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील मुलांच्या पंधरा वर्षाखालील गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला.
1 मिनिट वाचन

Pune News : पुणे /सांगली: पुण्याच्या नीरज नांदेडे याने पाचव्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील मुलांच्या पंधरा वर्षाखालील गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला. सूरज फाउंडेशन व सांगली जिल्हा टेबल टेनिस संघटना यांनी महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा कृष्णा व्हॅली स्कूल सांगली येथे आयोजित केली आहे. इंद्रजीने उपांत्यपूर्व फेरीत कोल्हापूरच्या संकल्प बांदिवडेकर यांच्यावर ११-९,११-५,११-७ असा सरळ तीन गेम्स मध्ये विजय मिळवला. त्याने टॉपस्पिन फटक्यांचा सुरेख खेळ केला. परम भिवंडीकर (टीएसटी मुंबई) याने आपलाच सहकारी मोहील ठाकूर याचा ११-८,५-११,११-६,११-८ असा पराभव केला टीएसटी संघाच्याच आकर्षण यादव याने ठाण्याच्या विहान हळदणकर याचे आव्हान ११-६,११-७,१०-१२, ११-८असे संपुष्टात आणले तर आकर्षण याचा सहकारी अहान गोसर याने टीएसटी संघाच्या आरव व्होरा याच्यावर ११-३,११-९,११-४ असा सफाईदार विजय मिळविला.https://maharashtramirror.com/ Pune News
मुलींच्या गटात मायरा सांगेलकर टी एस टी मुंबई हिने रुहीका वाणी (ठाणे) हिचा ११-६,१२-१०,११-२ असा पराभव केला तर ठाण्याच्या जिनया वधान हिने आपली सहकारी आराध्या कोकणे हिला ११-९, १२-१०, ११-७ असे पराभूत केले. ठाण्याच्याच ज्ञानश्री तरडे हिने उपांत्य फेरी गाठताना अनन्या चांदे या ठाण्याच्यात अनुभवी खेळाडूचा ११-४,८-११,११-९, ११-९ असा पराभव केला. टीएसटी संघाच्या त्रिशा लुबडे हिने कोल्हापूरच्या गीत जगताप हिचे आव्हान ८-११,११-६,११-४,११-७ असे संपुष्टात आणले.




