मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : मुंबईकरांसाठी दिवाळीची मोठी भेट! नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू; अवघ्या ७० मिनिटांत कोकण गाठता येणार!

Mumbai News :मुंबई : मुंबई आणि कोकणदरम्यान प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

मुंबईकरांसाठी दिवाळीची मोठी भेट! नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू; अवघ्या ७० मिनिटांत कोकण गाठता येणार!
मुंबईकरांसाठी दिवाळीची मोठी भेट! नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू; अवघ्या ७० मिनिटांत कोकण गाठता येणार!

Mumbai News :मुंबई : मुंबई आणि कोकणदरम्यान प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सिंधुदुर्गातील चिपी विमानतळापर्यंत थेट विमानसेवा सुरू होणार असून, या मार्गावरील तिकीट बुकिंगलाही सुरुवात झाली आहे. 'फ्लाय ९१' (Fly91) या विमान कंपनीकडून ही सेवा चालवली जाणार आहे. येत्या १६ नोव्हेंबरपासून नियमित विमान उड्डाणे सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news

अवघ्या ७० मिनिटांत मुंबई ते कोकण!
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील प्रवाशांना आता कोकणात जाण्यासाठी रेल्वे किंवा रस्ते वाहतुकीवर अवलंबून राहण्याची गरज कमी होणार आहे. नवी मुंबई ते सिंधुदुर्ग (चिपी) हा प्रवास अवघ्या ७० मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. विशेष म्हणजे, ही विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस उपलब्ध असणार आहे. या नव्या सेवेमुळे मुंबई आणि कोकण यांच्यातील हवाई संपर्क अधिक मजबूत होणार असून, कोकणात पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news

काय असेल विमानाचे वेळापत्रक?
'फ्लाय ९१'च्या नियोजित वेळापत्रकानुसार, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी विमान उड्डाण करेल. हे विमान सकाळी ९ वाजून ४ मिनिटांनी सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर पोहोचेल.

कोकणवासीयांसाठी प्रवासाचा नवा पर्याय!
गणेशोत्सव, दिवाळी तसेच उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते. अशा परिस्थितीत थेट विमानसेवा सुरू झाल्याने प्रवासाचा वेळ वाचणार आहे. विशेषतः नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक झालेल्या कोकणवासीयांसाठी ही सेवा फायदेशीर ठरू शकते. एकूणच, नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू झाल्याने कोकणच्या पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच मुंबई आणि कोकणातील अंतरही अधिक जवळ येणार आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा