मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai News : गुगल मॅपच्या नादाला लागून महिला कारसकट खाडीत!

Navi Mumbai Latest News : बेलापूरमधील धक्कादायक घटना; सागरी सुरक्षा पोलिसांमुळे महिलेचा जीव वाचला, 'अंधविश्वास' घातक ठरल्याची चर्चा.

V
Vivek

2 मिनिट वाचन

Navi Mumbai News : गुगल मॅपच्या नादाला लागून महिला कारसकट खाडीत!

Navi Mumbai Latest News : बेलापूरमधील धक्कादायक घटना; सागरी सुरक्षा पोलिसांमुळे महिलेचा जीव वाचला, 'अंधविश्वास' घातक ठरल्याची चर्चा.

नवी मुंबई: तंत्रज्ञानावर जास्त विसंबून राहणं कधीकधी कसं महागात पडू शकतं, याचा प्रत्यय शुक्रवारी पहाटे बेलापूरमध्ये आला. गुगल मॅपवर दाखवलेल्या दिशांवर विश्वास ठेवून कार चालवत असलेली एक महिला थेट खाडीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने, प्रसंगावधान राखून सागरी सुरक्षा पोलिसांनी तात्काळ मदतीचा हात दिला आणि महिलेचा जीव वाचला. Navi Mumbai Latest News

ही घटना शुक्रवारी (25 जुलै) मध्यरात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास घडली. संबंधित महिला आपल्या कारने उलवेच्या दिशेने जात होती. गुगल मॅपने तिला सरळ रस्ता दाखवला, त्यामुळे तिने पुलावरून न जाता, खालील पर्यायी मार्ग निवडला. मात्र, हा मार्ग थेट ध्रुवतारा जेट्टीकडे जात असल्याने, तिची कार अनपेक्षितपणे खाडीच्या पाण्यात कोसळली.

जवळच गस्त घालणाऱ्या सागरी सुरक्षा पोलिसांच्या ही बाब तात्काळ लक्षात आली. त्यांनी जराही वेळ न घालवता बोटीच्या सहाय्याने घटनास्थळी धाव घेतली आणि पाण्यात अडकलेल्या महिलेला सुखरूप बाहेर काढले. अपघातग्रस्त कारलाही नंतर क्रेनच्या सहाय्याने खाडीतून बाहेर काढण्यात आले. ही घटना थेट सागरी पोलिस चौकीसमोरच घडल्याने वेळेवर मदत पोहोचली आणि एक मोठा अनर्थ टळला.

गुगल मॅपवर 'अंधविश्वास' नको: स्थानिक माहितीही गरजेची

या घटनेने पुन्हा एकदा गुगल मॅपच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरात आणि अनोळखी ठिकाणी मार्ग शोधण्यासाठी गुगल मॅपचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो खरा, पण यातील माहिती अनेक वेळा अद्ययावत नसते. गुगल मॅपवरील रस्त्यांची माहिती प्रामुख्याने उपग्रह चित्रे, वापरकर्त्यांच्या लोकेशन डेटा आणि स्वयंसेवक वापरकर्त्यांच्या (गुगल मॅप्स कॉन्ट्रीब्युटर्स) फीडबॅकवर आधारित असते. त्यामुळे नव्याने बांधलेले रस्ते, बंद झालेले मार्ग किंवा सार्वजनिक वापरासाठी नसलेल्या मार्गांची माहिती वेळेवर अपडेट होत नाही.

ध्रुवतारा जेट्टीकडे जाणारा रस्ता हा सार्वजनिक वाहतुकीसाठी नाही, तरीही तो मॅपवर दर्शवला गेल्याने हा अपघात घडला. विशेषतः रात्रीच्या वेळी दिशांची स्पष्टता नसताना, अशा चुकीच्या मार्गांमुळे गंभीर अपघात होण्याचा धोका वाढतो. गुगल मॅपवरील माहिती अधिक अचूक होण्यासाठी स्थानिक प्रशासनानेही सहकार्य करणे आवश्यक आहे. नागरी संस्थांनी रस्ते, पूल, अडथळे, जेट्टी यांसारख्या बाबींची माहिती गुगल मॅपला पाठवल्यास अशा चुका कमी होऊ शकतात. त्याचप्रमाणे, नागरिकांनीही चुकीच्या माहितीबाबत 'फीडबॅक' देणे गरजेचे आहे, ज्यामुळे इतरांचे संभाव्य धोके टाळता येतील.

शेअर करा