मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai News : तळोजा पोलिसांच्या धडक कारवाईत महामार्गावर लुटमार करणारे दोन सराईत गुन्हेगार गजाआड

पनवेल : ओला, उबेर कार किंवा रिक्षा भाडे तत्वावर ऑफलाईन बुक करून निर्जनस्थळी लघवीच्या बहाण्याने उतरुन संबंधित चालकाच्या गळ्यावर चाकून ठेवून गाडीचा ताबा घेवून गाडीसह त्याल लुटून पळून जाणार्‍या दोघा सराईत गुन्हेगारांना तळोजा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून आतापर्यंत 4 गुन्हे उघडकीस करण्यात आ

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi Mumbai News : तळोजा पोलिसांच्या धडक कारवाईत महामार्गावर लुटमार करणारे दोन सराईत गुन्हेगार गजाआड

पनवेल : ओला, उबेर कार किंवा रिक्षा भाडे तत्वावर ऑफलाईन बुक करून निर्जनस्थळी लघवीच्या बहाण्याने उतरुन संबंधित चालकाच्या गळ्यावर चाकून ठेवून गाडीचा ताबा घेवून गाडीसह त्याल लुटून पळून जाणार्‍या दोघा सराईत गुन्हेगारांना तळोजा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून आतापर्यंत 4 गुन्हे उघडकीस करण्यात आले आहेत. Navi Mumbai Police Latest News

तळोजा पोलीस ठाण्याच्या Taloja Police Station हद्दीत अशा प्रकारचे दोन गुन्हे त्याचप्रमाणे पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गुन्हा व कल्याण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गुन्हा अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तळोजा पोलीस ठाण्याचे वपोनि प्रवीण भगत, पो.नि.गुन्हे निकम, पो.उपनिरीक्षक धुळगंडे, पो.हवा.मढवी, शिंदे, सावंत, पाटील, पोलीस कॉस्टेबल जाधव आदींच्या पथकाने या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या आधारे अधिक माहिती घेतली असता या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी सागर गोयल (25 रा.कल्याण) व त्याचा सहकारी संतोष नाटेकर (27 रा.कल्याण) हे हाजीमलंग कल्याण परिसरात लपल्याची माहिती मिळताच त्यांनी सलग तीन दिवस त्या ठिकाणी सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून आतापर्यंत 2 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यातील सेलेरिओ गाडी हस्तगत करण्यात आली आहे. या आरोपींमुळे अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. Navi Mumbai Police Latest News

शेअर करा