मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai News : 'लाचखोरांना जागा नाही'! - नवी मुंबईत भ्रष्टाचार विरोधी जनजागृतीसाठी विशेष हेल्पलाईन क्रमांकाचे उद्घाटन

• Special helpline number inaugurated in Navi Mumbai for anti-corruption awareness भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी ACB चा पुढाकार; शासकीय कामात लाच मागितल्यास 9920351064 या WhatsApp क्रमांकावर संपर्क साधा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi Mumbai News : 'लाचखोरांना जागा नाही'! - नवी मुंबईत भ्रष्टाचार विरोधी जनजागृतीसाठी विशेष हेल्पलाईन क्रमांकाचे उद्घाटन

•Special helpline number inaugurated in Navi Mumbai for anti-corruption awareness भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी ACB चा पुढाकार; शासकीय कामात लाच मागितल्यास 9920351064 या WhatsApp क्रमांकावर संपर्क साधा

नवी मुंबई :- प्रशासन भ्रष्टाचारमुक्त व्हावे आणि शासन व्यवस्थेत पारदर्शकता यावी या प्रमुख उद्दिष्टाने अँटी करप्शन ब्युरो (ACB), नवी मुंबई कार्यालयामार्फत आज परिसरातील नागरिकांसाठी एका विशेष सार्वजनिक हेल्पलाईन क्रमांकाचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाला अँटी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री. शिवराज पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते आणि त्यांनीच या हेल्पलाईन क्रमांकाचे लोकार्पण केले. यावेळी नवी मुंबई कार्यालयाचे पोलीस उप अधीक्षक धर्मराज सोनके यांच्यासह पोलीस निरीक्षक सुधीर निकम, किरणकुमार वाघ आणि अरुंधती येळवे उपस्थित होते.

भ्रष्टाचार आढळल्यास त्वरित तक्रार करा

नवी मुंबईत राहणाऱ्या नागरिकांना कोणत्याही शासकीय कार्यालय, कंत्राटी प्रक्रिया किंवा इतर सरकारी कामात लाच मागितल्यास किंवा कोणताही संशयास्पद व्यवहार आढळल्यास तातडीने तक्रार नोंदवण्यासाठी हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे.

प्रमुख अतिथी शिवराज पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले की, "भ्रष्टाचार विरुद्धचा लढा ही केवळ सरकारी यंत्रणेची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. जागरूक नागरिक हेच प्रामाणिक शासनाचे सर्वात मोठे बळ आहे."

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नवी मुंबईचे पोलीस उप अधीक्षक धर्मराज सोनके यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचारासंबंधी तक्रारी असल्यास त्यांनी त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नवी मुंबई येथे टोल फ्री क्रमांक 1064, दुरध्वनी क्रमांक 022-27833344 किंवा विशेष व्हॉट्सॲप क्रमांक 9920351064 यावर संपर्क साधावा.

हेही वाचा: Virar Crime News : घरफोडीची टोळी जेरबंद! - विरारमध्ये 'छत उचकटून' चोरी करणारे 4 आरोपी अटकेत; कल्याण, ठाण्यासह 5 गुन्हे उघड

शेअर करा