मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai News : नवी मुंबईत लेट नाईट डान्स बारवर कारवाईची मागणी; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची शक्यता

नवी मुंबई महाराष्ट्र मिरर : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पळस्पे, कोन, आसुडगाव, कळंबोली, पनवेल, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे आणि एपीएमसी परिसरात लेडीज कम डान्स बार अवैधरित्या पहाटेपर्यंत सुरू असल्याने येथील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi Mumbai News : नवी मुंबईत लेट नाईट डान्स बारवर कारवाईची मागणी; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची शक्यता

नवी मुंबई महाराष्ट्र मिरर : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पळस्पे, कोन, आसुडगाव, कळंबोली, पनवेल, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे आणि एपीएमसी परिसरात लेडीज कम डान्स बार अवैधरित्या पहाटेपर्यंत सुरू असल्याने येथील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यापूर्वी गृहमंत्री योगेश कदम यांनी स्वतः स्ट्रिंग ऑपरेशन करून या डान्स बारमधील गैरप्रकार उघडकीस आणले होते. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, या बारवर केवळ दिखाऊ कारवाई होत असून, प्रत्यक्षात पहाटेपर्यंत हे बार बिनदिक्कतपणे सुरू आहेत.

या प्रकरणी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडून कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे अवैध डान्स बार सुरू असतील, तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्याची मागणी जोर धरत आहे. यापूर्वी मुंबईचे पोलीस आयुक्त देवें भारती यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असेच प्रकार घडल्याने तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव चव्हाण यांना तातडीने निलंबित केले होते. याच धर्तीवर नवी मुंबईतही कारवाई होणार का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडून या प्रकरणात काय पावले उचलली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा: Mumbai News : IIT बॉम्बेमध्ये घुसखोरीचा धक्कादायक प्रकार! बिलाल अहमद तेली दुसऱ्यांदा सापडला, सुरक्षा यंत्रणाबाबत सवाल

शेअर करा