मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi mumbai metro : पेंधर मेट्रो तिकीट दरात कपात करण्याची मागणी

नवी मुंबईः बेलापूर-पेंधर मार्गावरील मेट्रो तिकीट Navi mumbai metro दरात कपात करा तसेच विद्यार्थ्यांसाठी मासिक पास योजना सवलतीच्या दरात सुरू करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेविका नेत्रा पाटील यांनी सिडको प्रशासनाकडे केली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi mumbai metro

नवी मुंबईः बेलापूर-पेंधर मार्गावरील मेट्रो तिकीट Navi mumbai metro  दरात कपात करा तसेच विद्यार्थ्यांसाठी मासिक पास योजना सवलतीच्या दरात सुरू करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेविका नेत्रा पाटील यांनी सिडको प्रशासनाकडे केली आहे. Navi mumbai metro

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी महाराष्ट्र शासन प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करत आहेत. खारघर तसेच परिसरातील इतर सेक्टर व गावातील रहिवाशांना नवी मुंबई मेट्रो सुरु झाल्यामुळे प्रवासाचा अजून एक सुविधा उपलब्ध झाली आहे. परंतु मेट्रोच्या तिकीट दरात कपात करणे गरजेचे आहे. सध्याचे तिकीट दर सर्वसामान्य प्रवाशांना परवडत नाहीत, असे नेत्रा पाटील Netra Patil यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.Navi mumbai metro

शहरात विविध नामांकित शैक्षणिक संस्था असल्याने शेकडो विद्यार्थी तेथे शिक्षण घेत असून खारघर हे मेट्रोचे स्थानक महत्वाचे ठरले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी मासिक पाच योजना सवलतीच्या दरात सुरू करण्यात यावी अशी मागणी नेत्रा पाटील यांनी केली आहे. Navi mumbai metro

हेही वाचा: Badlapur Crime News : ऑनलाइन फसवणूक ; ट्रेडिंग ॲप द्वारे ट्रेडिंग केल्यास आर्थिक आमिषाचा बळी

शेअर करा