मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत 'मॅजिक मोमेंट स्पा'वर धाड! मसाजच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाच्या रॅकेटमधून 15 महिलांची सुटका

•Magic Moment Spa Busted In Navi Mumbai : थायलंड, नेपाळसह सहा राज्यांतील महिलांना 6 हजार रुपयांच्या मोबदल्यात जबरदस्तीने वेश्याव्यवसायास भाग पाडत होते

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत 'मॅजिक मोमेंट स्पा'वर धाड! मसाजच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाच्या रॅकेटमधून 15 महिलांची सुटका

•Magic Moment Spa Busted In Navi Mumbai : थायलंड, नेपाळसह सहा राज्यांतील महिलांना 6 हजार रुपयांच्या मोबदल्यात जबरदस्तीने वेश्याव्यवसायास भाग पाडत होते

नवी मुंबई :- राज्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या कठोर निर्देशानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सीबीडी बेलापूर सेक्टर 15 येथील "मॅजिक मोमेंट वेलनेस स्पा" या मसाज पार्लरवर छापा टाकून एका वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 15 महिलांची सुटका केली असून, रॅकेटचा मास्टरमाइंड असलेला स्पा मालक आणि त्याचा सफाई कर्मचारी या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना गुप्त माहिती मिळाली होती की, मॅजिक मोमेंट वेलनेस स्पामध्ये महिलांना 6 हजार रुपयांच्या मोबदल्यात जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करून स्पामध्ये पाठवला. या ग्राहकाने माहिती दिल्यानंतर शनिवारी सायंकाळी पोलिसांनी स्पामध्ये धाड टाकली.

देश-विदेशातील महिलांची सुटका

या धाडीत पोलिसांना स्पामध्ये एकूण 15 महिला आढळून आल्या. पोलिसांनी केलेल्या चौकशीत स्पा सेंटरचा मालक आणि सफाई कामगार हे महिलांना मसाजच्या नावाखाली आणून त्यांना वेश्याव्यवसायासाठी भाग पाडत असल्याचे उघड झाले.

सुटका करण्यात आलेल्या महिलांमध्ये दोन महिला थायलंडमधील, एक नेपाळमधील तर इतर भारतभरातील आहेत. यामध्ये दिल्ली (2), उत्तर प्रदेश (2), पश्चिम बंगाल (1), गुजरात (1) आणि महाराष्ट्रातील (6) महिलांचा समावेश आहे.

याप्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. सीबीडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा: Aaditya Thackeray : "महाराष्ट्रात निवडणूक नाही म्हणून दुर्लक्ष!" अतिवृष्टीमुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 50 हजार मदतीची आदित्य ठाकरेंची मागणी

शेअर करा