मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत अंमली पदार्थांवर पोलिसांचा महाभयंकर घाला – तब्बल ₹26.48 कोटींचा माल जळत्या आगीत खाक!

नवी मुंबई | “नशा मुक्त नवी मुंबई” मोहिमेअंतर्गत आज नवी मुंबई पोलिसांनी ड्रग्स माफियांना थरकाप उडवणारी कारवाई केली.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत अंमली पदार्थांवर पोलिसांचा महाभयंकर घाला – तब्बल ₹26.48 कोटींचा माल जळत्या आगीत खाक!

नवी मुंबई | “नशा मुक्त नवी मुंबई” मोहिमेअंतर्गत आज नवी मुंबई पोलिसांनी ड्रग्स माफियांना थरकाप उडवणारी कारवाई केली. पोलिसांनी ३५ गुन्ह्यांमधून जप्त केलेले तब्बल ₹26 कोटी 48 लाखांचे अंमली पदार्थ आज (26 सप्टेंबर 2025) तळोजा एमआयडीसी येथील शासनमान्य वेस्ट मॅनेजमेंट सेंटरमध्ये जाळून नष्ट केले. या भव्य कारवाईस आमदार मंदाताई म्हात्रे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त दिपक साकोरे यांची उपस्थिती होती.

ही कारवाई म्हणजे मोहिमेचा दुसरा धडाकेबाज टप्पा आहे. याआधी ७९ गुन्ह्यांमधील ₹11 कोटी 61 लाखांचा माल आधीच नष्ट करण्यात आला होता.

अवघ्या तीन वर्षांची जबरदस्त आकडेवारी

2023 ते 2025 दरम्यान 1831 गुन्हे नोंदवून तब्बल 2854 आरोपींना अटक

आरोपींकडून एकूण ₹70.18 कोटींचा अंमली पदार्थ जप्त

त्यातच 101 आफ्रिकन नागरिकांकडून तब्बल ₹40 कोटींचा ड्रग्ज माल जप्त

2034 आफ्रिकन नागरिक हद्दपार, त्यातील 989 जण ब्लॅकलिस्ट

मोठ्या माफियांवर कडक कारवाई

अंमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात व्यापार करणाऱ्या 7 जणांवर MCOCA अंतर्गत कारवाई झाली असून आणखी 3 प्रस्ताव PIT-NDPS कायद्यांतर्गत मंजुरीसाठी पाठवले आहेत.

जनजागृती व पोलिसांचा लोहमुठा

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतून 8 जानेवारी 2025 रोजी या मोहिमेला सुरुवात झाली. शाळा, कॉलेज, सोसायट्यांत अंमली पदार्थांचे दुष्परिणाम समजावणारे बॅनर-होर्डिंग्ज लावले जात आहेत.

गुप्त माहितीकरिता हेल्पलाईन
ड्रग्जबाबत कोणतीही माहिती नागरिकांनी 8828 112 112 या क्रमांकावर द्यावी, पोलिसांनी माहितीदारांची ओळख गोपनीय ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.

नवी मुंबई पोलिसांची ही धडाकेबाज कारवाई म्हणजे ड्रग्ज माफियांना दिलेला स्पष्ट इशारा – “नशेचा व्यवसाय कराल, तर जळून खाक व्हाल!”

हेही वाचा: Fake Trading App : 'फेक ट्रेडिंग ॲप'च्या जाळ्यातून सायबर पोलिसांची यशस्वी सुटका! तक्रारदाराला परत मिळाले तब्बल 28 लाख रुपये

शेअर करा