मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत खंडणी प्रकरणी पत्रकार व त्याच्या महिला साथीदारास अटक

नवी मुंबई : नवी मुंबईतील तुर्भे येथील ऑर्केस्ट्रा बार सुरु ठेवायचा असेल तर २ लाख रुपये द्यावे लागतील अशी धमकी देत खंडणी मागितल्या प्रकरणी दोन जणांच्या विरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi Mumbai Crime News

नवी मुंबई : नवी मुंबईतील तुर्भे येथील ऑर्केस्ट्रा बार सुरु ठेवायचा असेल तर २ लाख रुपये द्यावे लागतील अशी धमकी देत खंडणी मागितल्या प्रकरणी दोन जणांच्या विरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक पत्रकार असून दुसरी त्याची महिला साथीदार आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ हालचाल करीत दोन्ही आरोपींना अटक केले आहे. संदीप रासकर आणि सोनाली दुनघव असे यातील अटक आरोपींचे नाव आहे. एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीत हेवन सिक्स व एमएच ४३ नावाचे ऑर्केस्ट्रा बार आहे.

याच ठिकाणी काही दिवसापूर्वी दोन्ही आरोपी आले होते. त्यांनी हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधत तुमचा बार बाबत पोलीस ठाण्यात तक्रार न करण्यासाठी तसेच बार चालवायचा असेल तर दोन लाखांची खंडणीची मागणी केली. हि मागणी मान्य न झाल्यास पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार देत हजारोंच्या संख्येने बार वर महिलांचा मोर्चा आणून बार वर हल्ला करत बार उध्वस्त केला जाईल असे सांगत जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून तक्रार केली जाईल अशी धमकीही देण्यात आली.त्यामुळे हॉटेल प्रशासनाने तडजोड करीत २ ऐवजी एक लाखांची खंडणी देण्याचे ठरले या पैकी २५ हजार रुपये बळजबरीने घेत तेथून निघून गेले. याबाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली . या तक्रारीची शहानिशा करीत पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद केला आणि तात्काळ हालचाल करीत पुणे येथील रहिवासी असलेला कथित पत्रकार संदीप याला अटक केले. त्याने घेतलेले २५ पैकी १८ हजार जप्त करण्यात आले आहेत.

हेही वाचा: Congress Nana Patole : हा जुमला अर्थसंकल्प, काँग्रेसची गॅरंटी…,' महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर नाना पटोलेंचा निशाणा

शेअर करा