मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai CIDCO Land : अडीचशे कोटींची जमिन सिडकोला देण्यास नकार पेंधर ग्रामस्थांचा विरोध

पनवेल : पेंधर गावात Pendhar Village चारशे ते पाचशे कुळ असून त्यापैकी प्रत्येकाचा भाव अडीचशे कोटी रुपये आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi Mumbai CIDCO Land : अडीचशे कोटींची जमिन सिडकोला देण्यास नकार पेंधर ग्रामस्थांचा विरोध

पनवेल : पेंधर गावात Pendhar Village चारशे ते पाचशे कुळ असून त्यापैकी प्रत्येकाचा भाव अडीचशे कोटी रुपये आहे. मात्र महसूल विभाग आणि सिडको मार्फत कुळांवर अन्याय करुन सावकार तसेच इतर महसूल अधिकारी हजारो रुपयांचा भ्रष्टाचार करत आहेत. ताब्यात असलेल्या कुळाच्या जमिनी इतरांच्या नावावर करुन सिडको व प्रशासन यात गोंधळ कारभार चालू आहे. आमच्या कुळहक्काच्या जमिनींचे संरक्षण करुन न्याय द्यावा अन्यथा सिडको समोर आमरण उपोषणास बसू असा इशारा पेंधर पो. नावडे, ता. पनवेल येथील मनोज गोपीनाथ पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाठ यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. Navi Mumbai CIDCO Land

मुंबई कुळवहिवाट शेतजमिन अधिनियम १९४८ कलम ३ अ प्रमाणे १९४८ मध्ये सर्व्हे नंबर २५४/७+८ संरक्षित कुळ म्हणून नोंद असलेली प्रत्यक्ष ताबा कब्जा वहिवाट आणि राहत असलेले घर क्रमांक ७७३ चे बाजारमुल्य अडीचशे कोटी रुपये आहे. मात्र ही जमिन कुळ कायद्याची अंमलबजावणी न करता प्रांताधिकारी, मेट्रो सेंटर पनवेल -३ सिडको अध्यक्ष संजय शिरसाठ, तहसिलदार यांनी विष्णू जोमा म्हात्रे (नावडे), नारायण जोमा म्हात्रे यांच्या नावे करुन कुळाची फसवणूक करण्याचा प्रयत्न संगनमताने केला आहे. त्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवुन आमच्या कुळहक्काच्या जमिनी जबरदस्तीने ताबा मिळवू पाहणा-या सिडको, रस्त्याच्या ठेकेदारापासून संरक्षण द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. जमिन कसणाऱ्या मागासवर्गीय कुळांवर महसूल विभाग व नगरविकास विभाग पुर्वीच्या उच्चवर्गीय खोतांप्रमाणेच अन्याय करत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शेतकरी प्रबोधिनीचे नेते राजाराम पाटील हे पेंधर ग्रामस्थांसोबत उपोषणास बसणार आहे. Navi Mumbai CIDCO Land

कुळाच्या जमिनी परस्पर इतरांच्या नावावर करुन सिडकोने फसवणूक केली आहे. कुळकायदा नाकारण्याचा अधिकार कोणालाही नाही. सिडको आणि तहसिलदारांकडून उरण, पनवेलमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होत आहे. कुळकायद्याची अंमलबजावणी नाही झाली तर अन्यायाविरुध्द आवाज उठविणार आहे.

  • राजाराम पाटील, शेतकरी प्रबोधिनी
  • हेही वाचा: अबब..!! व्हेलच्या उलट्यांची तस्करी.. सोन्याची किंवा हिऱ्यापेक्षा किंमत जास्त,पोलिसांनी 3 जणांना अटक केली

    शेअर करा