मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai Bribe News : प्रशासकीय वर्तुळात खळबळ: कोकण विभागाचे पुरवठा उपायुक्त 5 लाखांची लाच घेताना जेरबंद

• बेलापूरच्या हॉटेलबाहेर एसीबीचा 'सर्जिकल स्ट्राईक'; दोन खाजगी दलालांसह बड्या अधिकाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

V
Vivek

2 मिनिट वाचन

Beed Bribe News

•बेलापूरच्या हॉटेलबाहेर एसीबीचा 'सर्जिकल स्ट्राईक'; दोन खाजगी दलालांसह बड्या अधिकाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

नवी मुंबई | सर्वसामान्यांच्या तांदळावर डल्ला मारणाऱ्या भ्रष्ट साखळीचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पर्दाफाश केला आहे. कोकण विभागाचे पुरवठा उपायुक्त (वर्ग 1) अनिल सुधाकर टाकसाळे यांना 5 लाख रुपयांची लाच घेताना ठाणे एसीबीच्या पथकाने नवी मुंबईत रंगेहात पकडले. धक्कादायक बाब म्हणजे, टाकसाळे यांनी सरकारी कामासाठी चक्क खाजगी व्यक्तींची नेमणूक केली होती, ज्यांच्या माध्यमातून लाचेचे व्यवहार चालवले जात होते. या कारवाईत साई प्रतिम अमिन आणि राजा गणेश थेवर या दोन खाजगी इसमांनाही अटक करण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी भिवंडीतील एका तांदूळ गोदामावरील कारवाईशी संबंधित आहे. तक्रारदार यांचा 'आई एकविरा ट्रेडिंग कंपनी' नावाने तांदूळ विक्रीचा व्यवसाय आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटी उपायुक्त टाकसाळे आणि त्यांच्या पथकाने या गोदामावर धाड टाकून अवैध साठा असल्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातून सुटका करण्यासाठी, सुनावणीच्या वेळी मदत करण्यासाठी आणि भविष्यात व्यवसाय सुरळीत चालू ठेवण्यासाठी टाकसाळे यांनी तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली. 'गुड लक' म्हणून 5 लाख रुपये रोख आणि दरमहा 1 लाख 50 हजार रुपयांचा हप्ता अशा स्वरूपाची ही मागणी होती.

तक्रारदाराने या भ्रष्टाचाराला बळी न पडता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. 5 जानेवारी रोजी तक्रार प्राप्त होताच विभागाने सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केला. 7 जानेवारी रोजी करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये लाचेची मागणी सिद्ध झाली. त्यानंतर आज 12 जानेवारी रोजी सीबीडी बेलापूर येथील हॉटेल लक्ष्मी परिसरात सापळा रचण्यात आला. दुपारीच्या दरम्यान हॉटेलसमोरील फूटपाथवर तक्रारदाराकडून 5 लाखांची रोकड स्वीकारताना राजा थेवर याला पकडण्यात आले. त्यानंतर लगेचच त्याचा साथीदार साई अमिन याला ताब्यात घेऊन या साखळीचा मुख्य सूत्रधार असलेले उपायुक्त अनिल टाकसाळे यांना कोकण भवन येथून अटक करण्यात आली.

अत्यंत गोपनीय पद्धतीने राबवण्यात आलेल्या या मोहिमेमुळे शासकीय कार्यालयांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. एका बाजूला प्रशासन पारदर्शकतेचा दावा करत असताना, दुसरीकडे वर्ग चा अधिकारी खाजगी हस्तकांमार्फत हप्तेखोरी करत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. पोलीस अधीक्षक शिवराज पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पूर्ण करण्यात आली असून, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आणखी कोणापर्यंत पोहोचतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: BMC Election 2026 : भाजपचा बंडखोरांना 'दणका'! मुंबईतील 26 जणांचे 6 वर्षांसाठी निलंबन; आसावरी पाटील, नेहल शहा यांच्यावर कारवाई

शेअर करा