मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai Anti- Corruption News : नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कार्यवाही ; महसूल सहाय्यक अधिकारी लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

• Navi Mumbai Anti Corruption News पनवेल तहसिल कार्यालय येथील महसुल सहाय्यक अधिकारी यांना लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतले ताब्यात

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi Mumbai Anti- Corruption News : नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कार्यवाही ; महसूल सहाय्यक अधिकारी लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

•Navi Mumbai Anti Corruption News पनवेल तहसिल कार्यालय येथील महसुल सहाय्यक अधिकारी यांना लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतले ताब्यात

नवी मुंबई :- पनवेल तहसिल कार्यालय,येथील महसुल सहाय्यक अधिकारी यांना लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे.अटक केलेल्या महसूल सहाय्यक,किरण अर्जुन गोरे (48 वर्ष) आहे.तक्रारदार यांनी त्यांच्या वडीलोपार्जित शेती असलेली जमीन मुंबई कुळव्यवस्थापन व शेतजमिनी कायदे अंतर्गत जमीनीची नोंद कमी करून (भोगवटादार वर्ग-2) वरुन सदर जमीनीची भोगवटादार वर्ग - 1अशी दोन स्वतंत्र सर्व्हे कमांकाच्या जमिनीची नोंद करण्यासाठी सहाय्यक महसूल अधिकारी किरण गोरे यांने 1 लाख लाचेच्या रक्कमेची मागणी करीत असल्याबाबत तक्रारदार यांनी 4 मार्च रोजी Anti corruption Bureau नवी मुंबई कार्यालयात तक्रार दिली होती. शासकिय पंचासमक्ष करण्यात आलेल्या लाचेच्या मागणीच्या सत्यता पडताळणी दरम्यान गोरे यांनी तक्रारदारा यांचेकडे तडजोडीअंती 80 हजार लाचेच्या रक्कमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. Navi Mumbai Anti- Corruption News

त्यानंतर दिनांक 14 मार्च रोजी लोकसेवक गोरे यांनी तक्रारदार यांचेकडे एका जमीनीच्या नोंदी करीता 40 हजार लाचेच्या रक्कमेची मागणी करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नवी मुंबई यांनी आजमविलेल्या सापळा कार्यवाई दरम्यान लोकसेवक किरण अर्जुन गोरे यांनी तक्रारदार यांच्याकडून 40 हजार लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर त्यांना सायंकाळी 5.44 वाजता रंगेहाथ पकडले आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केला जात आहे. Navi Mumbai Anti- Corruption News

शेअर करा