मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करणार: अतुल सावे

इतर मागास बहुजन कल्याण मंत्र्यांनी भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी केली

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करणार: अतुल सावे

इतर मागास बहुजन कल्याण मंत्र्यांनी भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी केली

पुणे: महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाकडून विविध उपक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे, याच पार्श्वभूमीवर भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले.

सावे यांनी आज भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी केली, यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर, अधीक्षक अभियंता बिपिन शिंदे, निलेश गिरमे, भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष अजय खेडेकर, पीएमपीएलचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत डोके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सावे म्हणाले, "क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती नागरिकांना व्हावी, याकरिता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत चर्चा करुन भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करुन कामाची सुरुवात करण्यात आली होती. सद्यस्थितीत पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून स्मारकाचे काम वेगाने सुरू असून सध्याची ९० टक्के काम पूर्ण झाले आहे." या कामाबद्दल समाधान व्यक्त करत उर्वरित विकास कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी सावे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी नायर यांनी पुणे महानगरपालिकेच्यावतीने भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक विकास आराखड्याच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामांबाबत माहिती दिली.

इमारतीची वैशिष्ट्ये आणि सुविधा
स्मारकामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित विविध आधुनिक सुविधा असणार असून यामध्ये ऑडिओ-व्हिडिओ शो, दोन्ही महापुरुषांच्या जीवनचरित्रावर आधारित 'थीम बेस्ड' ऑडिओ-व्हिडिओ शो आणि होलोग्राफीचे काम करण्यात येणार आहे. या दोन्ही महापुरुषांचे अर्धपुतळे आणि त्यांच्या कार्याची माहिती प्रदर्शित केली जाणार आहे. मुली आणि महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र, मार्गदर्शन केंद्र आणि संगणक केंद्र उभारले जाणार आहे. स्मारकात एक ॲम्फीथिएटर देखील असणार आहे.

शेअर करा