मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

National Herald Case Update : गांधी कुटुंबाला मोठा दिलासा! - नॅशनल हेराल्ड प्रकरणात राउज अव्हेन्यू न्यायालयाने 'ईडी'च्या आरोपपत्राची दखल घेण्यास दिला नकार

राहुल आणि सोनिया गांधींना सध्या न्यायालयात हजर राहावे लागणार नाही; 'सीबीआयने प्रेडिकेट गुन्हा नोंदवला नाही तरी ईडी तपास कसा करते?' न्यायालयाने उपस्थित केला प्रश्न

V
Vivek

1 मिनिट वाचन

National Herald Case Update : गांधी कुटुंबाला मोठा दिलासा! - नॅशनल हेराल्ड प्रकरणात राउज अव्हेन्यू न्यायालयाने 'ईडी'च्या आरोपपत्राची दखल घेण्यास दिला नकार

राहुल आणि सोनिया गांधींना सध्या न्यायालयात हजर राहावे लागणार नाही; 'सीबीआयने प्रेडिकेट गुन्हा नोंदवला नाही तरी ईडी तपास कसा करते?' न्यायालयाने उपस्थित केला प्रश्न

ANI :- काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील राउज अव्हेन्यू न्यायालयाने या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या आरोपपत्राची (Charge Sheet) दखल घेण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.

कोर्टाची महत्त्वपूर्ण निरीक्षणे

आज या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्तींनी आदेश वाचण्यास सुरुवात करताना, तपासाच्या मूळ केंद्रावरच प्रश्न उपस्थित केले.

न्यायमूर्ती म्हणाले, "सीबीआयने आतापर्यंत कोणताही प्रेडिकेट गुन्हा (Predication Offence) नोंदवलेला नाही. तरी देखील ईडीने पीएमएलए (PMLA) अंतर्गत तपास सुरू ठेवला आहे."

यापूर्वी दोन आठवड्यांपूर्वी, दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप करत याच प्रकरणात नवीन गुन्हा दाखल केला होता. मात्र, आता राउज अव्हेन्यू न्यायालयाच्या या निर्णयामुळे गांधी कुटुंबाला तात्काळ दिलासा मिळाला आहे.

ईडीचा मूळ आरोप काय?

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांच्या तक्रारीत आरोप केला होता की, नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राचे प्रकाशक असलेल्या असोशिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL) ची मालमत्ता बेकायदेशीरपणे यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड (YIPL) या कंपनीमार्फत बळकावण्यात आली आहे.

न्यायालयाने आरोपपत्राची दखल घेण्यास नकार दिल्यामुळे, सध्या या प्रकरणाची सुनावणी होणार नाही आणि राहुल गांधी व सोनिया गांधी यांना न्यायालयात हजर राहावे लागणार नाही, असे मानले जात आहे.

हेही वाचा: Mumbai Crime News : उत्खननातील सोने' सांगून 25 लाखांचा गंडा! - मालाड पोलिसांचा गुजरातपर्यंत थरारक पाठलाग; चार आंतरराज्यीय ठगांना अटक, 15.45 लाख रुपये जप्त

शेअर करा