मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nanded Breaking News : नांदेडमध्ये कोचिंग शिक्षकाचा 16 वर्षीय मुलीचा विनयभंग, लोकांनी केली तोडफोड

Nanded Breaking News : नांदेडच्या भाग्यनगर पोलिसांनी सांगितले की, सोमवारी भाग्यनगर येथील एका खासगी कोचिंग सेंटरमधील शिक्षकाविरुद्ध मुलीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Nanded Breaking News : नांदेडमध्ये कोचिंग शिक्षकाचा 16 वर्षीय मुलीचा विनयभंग, लोकांनी केली तोडफोड

Nanded Breaking News : नांदेडच्या भाग्यनगर पोलिसांनी सांगितले की, सोमवारी भाग्यनगर येथील एका खासगी कोचिंग सेंटरमधील शिक्षकाविरुद्ध मुलीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

नांदेड :- कोलकाता आरजी कार मेडिकल कॉलेजमधील आणि राज्यातील बदलापूर Badlapur School Case येथील घटनेनंतर आता पुन्हा एकदा नांदेडमधून एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची Nanded Rape case बातमी समोर आली आहे. नादेंद येथील कोचिंग सेंटरमध्ये एका शिक्षकाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे. या घटनेची माहिती मिळताच संतप्त लोकांनी संपूर्ण कोचिंग सेंटरची तोडफोड केली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ॲट्रॉसिटी आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. या शिक्षकाचे 55 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेबाबत भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे यांनी सांगितले की, सोमवारी भाग्यनगर येथील एका खासगी कोचिंग सेंटरमध्ये शिक्षक नागेश जाधव याच्याविरुद्ध मुलीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Nanded Breaking News

याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच पीडितेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी पीडित अल्पवयीन मुलीने आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती तिच्या पालकांना दिली. यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली. 2 सप्टेंबर रोजी सकाळी स्थानिक लोकांना याची माहिती मिळाली, त्यानंतर त्यांनी कोचिंग सेंटरमध्ये जाऊन तोडफोड केली. Nanded Breaking News

हेही वाचा: Narayan Rane : 'छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती', नारायण राणेंच्या वक्तव्याने खळबळ

शेअर करा