मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nalasopara Crime News : शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक! सायबर विभागाच्या NCCRP Portal तक्रार फसवणुकीतील पैसे परत

•सायबर पोलिसांचे उत्कृष्ट कामगिरी ; शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूकीत हडप झालेली रक्कम सायबर पोलिसांकडून परत

V
Vivek

1 मिनिट वाचन

Nalasopara Crime News : शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक! सायबर विभागाच्या NCCRP Portal तक्रार फसवणुकीतील पैसे परत

•सायबर पोलिसांचे उत्कृष्ट कामगिरी ; शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूकीत हडप झालेली रक्कम सायबर पोलिसांकडून परत

नालासोपारा :- शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग खाते उघडून पैसे गुंतविल्यास कमी दिवसांत चांगला परतावा मिळेल, असे आमिष सायबर गुन्हेगारांकडून लोकांना दाखविले जात आहे. सुरवातीला थोड्या रकमेचा परतावा लगेचच दिला जातो, जेणेकरून समोरील व्यक्ती विश्वास ठेवून जास्त पैसे गुंतविण्यास तयार होईल.मात्र, मोठी रक्कम हाती लागल्यानंतर सायबर गुन्हेगार ना मुद्दल ना जादा परतावा देतात अशी वस्तुस्थिती आहे. अशीच रक्कम फसवणूक झालेल्या अर्नाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या जाधव यांनी सायबर विभागाच्या NCCRP Portal येथे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर सायबर विभागाच्या पोलिसांनी त्वरित ती रक्कम परत मिळवून देण्यास यश आले आहे.

Avinash-Ambure

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील अर्ना अर्नाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार आहे जाधव यांना मोबाईलवर एक लिंक प्राप्त झाली होती. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग केल्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक नफा मिळेल या आमिषाला बळी पडत जाधव यांनी त्या आर्थिक गुंतवणूक केली होती. परंतु गुंतवणूक केलेल्या रक्कमेपैकी कोणत्याही प्रकारे परतावा न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाली असे लक्षात येतात बुरमान यांनी सायबर पोलिसांच्या NCCRP Portal वर तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारदार यांनी वेळोवेळी केलेले आर्थिक व्यवहाराची तपासणी करून सर्व रक्कम पोलिसांना गोठाविण्यात आली. पोलिसांनी बँकेची आणि न्यायालयाची पत्रव्यवहार करून फसवणुकीतील रक्कम बुरमान यांच्या मूळ खात्यावर परत मिळवून देण्यात यश आले आहे. पोलिसांना फसवणुकीतील 4 लाख 90 हजार रुपयांची रक्कम जाधव यांच्या खात्यात परत मिळवून देण्यास यश आले आहे.

पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा माळी, पोलीस अंमलदार विलास खाटीक, शुभम कांबळे यांनी पार पाडली आहे.

हेही वाचा: Vidhansabha Election 2024 : पोलिसांसाठी मोठी बातमी ; विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सुट्टया बंद!

शेअर करा