मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nalasopara Prostitution News : वेश्या व्यवसायातून दोन पिडित महिलेची सुटका, वेश्या दलाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Nalasopara Prostitution News : अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष भाईंदर पथकाची कारवाई ; वेश्या दलाल दीदीला अटक, दोन पिढीत महिलेची सुटका, पोलिसांची कामगिरी बोगस गिऱ्हाईक पाठवून पोलिसांनी केला पर्दाफाश‌

V
Vivek

2 मिनिट वाचन

पोलिसांकडून धडाकेबाज कामगिरी बोगस गिऱ्हाईक, वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, दीदी अटकेत
पोलिसांकडून धडाकेबाज कामगिरी बोगस गिऱ्हाईक, वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, दीदी अटकेत

Nalasopara Prostitution News : अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष भाईंदर पथकाची कारवाई ; वेश्या दलाल दीदीला अटक, दोन पिढीत महिलेची सुटका, पोलिसांची कामगिरी बोगस गिऱ्हाईक पाठवून पोलिसांनी केला पर्दाफाश‌

नालासोपारा :- पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सुरेखा उर्फ दीदी परब ही महिला जबरदस्तीने आणि बेकायदेशीररित्या वेश्याव्यवसाय Illegal Sex Racket चालवत असल्याची माहिती मिळाली होती. साधारणपणे मोबाईलवर संपर्क करून आर्थिक देवाण-घेवाण करून मुली पुरवत असल्याचे पोलिसांना Nalasopara Police Station माहिती मिळाली होती. Nalasopara Prostitution Latest News

पोलिसांकडून धडाकेबाज कामगिरी बोगस गिऱ्हाईक, वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, दीदी अटकेत

पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसाची दोन बोगस गिऱ्हाईक व दोन पंच बोलावून वेश्या दलाल सुरेखा उर्फ दीदी रवींद्र परब हिला सांगितल्याप्रमाणे राधाकृष्ण व्हेज रेस्टॉरंट, इंदिरा नर्सिंग होमच्या समोर, सेक्टर 07, शांतीनगर, मिरारोड पूर्व या ठिकाणी पाठवुन सत्यता पडताळून 1.55 वा. छापा टाकला असता, दोन पीडित महिला वेश्याव्यवसाय करण्याकरिता पोचले असता त्यांना पोलिसांनी अटकाव केला तसेच वेश्या दलाल सुरेखा उर्फ दीदी रवींद्र परब (49 वर्ष) (रा. रुम नं. सी/13 अनिकेत बिल्डींग नं. 09, तलाच रोड भाईंदर पुर्व ता.जि.ठाणे) हिला अटक करण्यात आली आहे. Police's Daring Operation: Fake Customer Exposes Prostitution Racket, Madam Arrested तसेच या पीडित महिलेच्या जीवावर ही दीदी स्वतःच्या पैशाच्या स्वार्थासाठी त्यांच्याकडून हे काम करून घेत होते. सहाय्यक फौजदार उमेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरेखा उर्फ दीदी या वेश्या दलाल विरोधात नया नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 143(3), सह अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 4,5 प्रमाणे दिनांक 18 जुलै रोजी गुन्हा दाखल आहे. Nalasopara Prostitution Latest News

पोलीस पथक

अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, (गुन्हे) मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, सहाय्यक पोलीस उमेश पाटील, राजु भोईर, शिवाजी पाटील, रामचंद्र पाटील, पोलीस हवालदार किशोर पाटील, पोलीस शिपाई शिंदे, राजपुत, पोलीस हवालदार सम्राट गावडे, महिला पोलीस शिपाई भिलारे, जाधव व अश्विनी वाघमारे, सर्व नेम. अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष भाईंदर यांनी दोन पिडित महिलेची सुटका करून वेश्या दलाला ताब्यात घेतले आहे. Nalasopara Prostitution Latest News

शेअर करा