मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nalasopara Crime News : नालासोपाऱ्यात अंमली पदार्थ विक्रीचा पर्दाफाश ; 30 लाखांचा मुद्देमाल जप्त!

ड्रग्ज माफियांचा जाळा उद्ध्वस्त; मॅफेड्रॉन व रोकड हस्तगत,रात्रीच्या सापळ्यात पोलिसांची कारवाई, तीन आरोपी अटकेत

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane Crime News

  • ड्रग्ज माफियांचा जाळा उद्ध्वस्त; मॅफेड्रॉन व रोकड हस्तगत,रात्रीच्या सापळ्यात पोलिसांची कारवाई, तीन आरोपी अटकेत
  • नालासोपारा | नालासोपाऱ्यातील झपाट्याने वाढणाऱ्या अंमली पदार्थ व्यापारावर पोलिसांनी तडाखेबाज कारवाई करत चक्क 30 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या धडाकेबाज कारवाईत 13.9 लाख रुपयांचे मॅफेड्रॉन आणि 17 लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली असून, एकाच टोळीतील तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले.

    रात्रीच्या सापळ्यात पोलिसांची कारवाई, तीन आरोपी अटकेत

    ही कारवाई 11 जुलै 2028 रोजी मध्यरात्री, माणिकपूर (वसई) येथील मॅकडॉनल्ड समोर करण्यात आली. गुप्त माहितीवरून अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचत पहिल्या आरोपीकडून 69.5 ग्रॅम मॅफेड्रॉन (किंमत 13.90 लाख ) जप्त केलं. त्याच्यावर NDPS कायदा कलम 8(क), 22(क) अन्वये माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

    तपासाचा पुढचा धागा नालासोपाऱ्यात पोहचताच दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आलं. चौकशीदरम्यान कळ्याच्या घरात लपवून ठेवलेली 17 लाखांची रोकड सापडली. आरोपीने कबूल केलं की, ती रक्कम अंमली पदार्थ विक्रीतून मिळालेली आहे. त्यामुळे तीही जप्त करण्यात आली.

    हेही वाचा: Naigaon Crime News : नायगावमध्ये ‘चरस चक्र’ उद्ध्वस्त – नेपाळी नागरिकासह साथीदार अटकेत!

    शेअर करा