मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Naigaon News : अडकलेल्या शटल कॉकचा जीवावर बेतला खेळ! नायगावमध्ये विजेचा धक्का लागून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

•एसीमधून बाहेर पडणाऱ्या विद्युत प्रवाहाकडे दुर्लक्ष

V
Vivek

1 मिनिट वाचन

Naigaon News : अडकलेल्या शटल कॉकचा जीवावर बेतला खेळ! नायगावमध्ये विजेचा धक्का लागून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

•एसीमधून बाहेर पडणाऱ्या विद्युत प्रवाहाकडे दुर्लक्ष

नालासोपारा :- नायगाव पश्चिमेतील बीच कॉम्प्लेक्समध्ये एका बालकाने आपला जीव गमावल्याची हादरवणारी घटना घडली आहे. बॅडमिंटन खेळताना पहिल्या मजल्यावर अडकलेला शटल कॉक काढण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय आकाश संतोष साहू याचा एसीच्या विद्युत प्रवाहामुळे जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आकाश हा सेंट झेविअर हायस्कूलमध्ये दहावीत शिक्षण घेत होता. खेळाच्या ओढीपोटी त्याने शटल काढण्यासाठी वर चढ घेतली, मात्र तिथे सुरु असलेल्या एसीच्या संपर्कात येताच त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. ही दुर्घटना सोसायटीतील सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

या प्रकरणी परिसरातील नागरिकांनी संबंधित फ्लॅटधारकाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला आहे. चालू असलेल्या एसीमधून विद्युत प्रवाह बाहेर पडत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, असा आरोप आहे. "ही केवळ अपघाताची घटना नाही, तर निष्काळजीपणामुळे गेलेला निष्पाप जीव आहे," अशी भावना रहिवाशांनी व्यक्त केली असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

हेही वाचा: शिवकालीन वारशाला जागतिक मान्यता! शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत

शेअर करा