मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Weather Update : मोसमी पावसाची माघार होताच राज्यात 'ऑक्टोबर हीट'चा चटका!

•सांताक्रूझमध्ये 37°C तापमानाची नोंद; कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Weather Update : "या दिवशी"ठाणे, रायगड जिल्हा आणि मुंबईच्या अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

•सांताक्रूझमध्ये 37°C तापमानाची नोंद; कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

मुंबई :- राज्यात सध्या उन्हाचा कडाका, उकाडा आणि ढगाळ वातावरण अनुभवयाला मिळत आहे. शुक्रवारी (17 ऑक्टोबर 2025) मोसमी पावसाने संपूर्ण देशातून माघार घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. या माघारीनंतर राज्यात 'ऑक्टोबर हिट'चा तीव्र चटका जाणवत आहे. याचबरोबर दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाले आहेत.

सांताक्रूझमध्ये सर्वाधिक तापमान

मोसमी पावसाने माघार घेतल्यानंतर राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. अनेक भागांमध्ये कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले गेले आहे, ज्यामुळे नागरिकांना असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. शुक्रवारी संपूर्ण राज्यात सांताक्रूझ (मुंबई) येथे सर्वाधिक 37 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, जे सरासरीपेक्षा अधिक होते. ऑक्टोबरमध्ये कमाल तापमान साधारण 33 अंश सेल्सिअस अपेक्षित असते. समुद्रावरून येणारे वारे उशिरा वाहत असल्यामुळे मुंबईच्या तापमानात वाढ झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

या भागात पावसाची शक्यता

एकीकडे तापमानाचा पारा चढा असताना, हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवसांदरम्यान काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम

अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटाजवळ चक्राकार वारे वाहत आहेत आणि त्यांची दिशा दक्षिणेकडे झुकलेली आहे. यामुळे शनिवारी लक्षद्वीप परिसरात केरळ-कर्नाटक किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात सध्या ऑक्टोबर हिटचा चटका चांगलाच अनुभवायला मिळत असून, पुढील दोन ते तीन दिवस तापमानातील ही वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा: Thackeray Brothers : शिवाजी पार्कवर 'ठाकरे' कुटुंबाचं ऐतिहासिक मनोमीलन!

शेअर करा