मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Water Supply : मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली! तानसा तलाव भरला, पाणीकपातीचे संकट टळले

•मध्य वैतरणा आणि मोडक सागरनंतर तानसाचीही भरारी; एकूण जलसाठा 86.88 टक्क्यांवर

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Water Supply : मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली! तानसा तलाव भरला, पाणीकपातीचे संकट टळले

•मध्य वैतरणा आणि मोडक सागरनंतर तानसाचीही भरारी; एकूण जलसाठा 86.88 टक्क्यांवर

मुंबई :- मागील काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात सातत्याने सुरू असलेल्या दमदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. याआधी 7 जुलै रोजी 'हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयाचे' तीन दरवाजे उघडण्यात आले होते, तर 9 जुलै रोजी मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागला होता. आता पाठोपाठ तानसा तलावानेही पाणीदार मुंबईकरांना दिलासा दिला आहे.

आज सकाळी 6 वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व सातही तलावांमध्ये त्यांच्या एकूण क्षमतेच्या 86.88 टक्के इतका जलसाठा जमा झाला आहे. यामुळे मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट तूर्तास टळले असून, पुढील काळात पाण्याची चिंता मिटली आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असलेले तानसा धरण हे सर्वात जुन्या दगडी बांधांपैकी एक मानले जाते. आज ओसंडून वाहू लागलेल्या तानसा तलावाची कमाल जलधारण क्षमता 14,508 कोटी लीटर एवढी आहे.

हेही वाचा: Beed Breaking News : रक्षकच बनला भक्षक; पोलीस दलात खळबळ, विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह!

शेअर करा