मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Viral Video : अंधेरी-घाटकोपर लिंक रोड वरील कारच्या डोरला लटकून स्टँड करणारा स्टंटमॅन अटकेत

Mumbai Viral Video : मद्यधुंद अवस्थेत असलेला कारचालक चक्क कारच्या दरवाजावर लटकून स्टंट, व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Viral Video : अंधेरी-घाटकोपर लिंक रोड वरील कारच्या डोरला लटकून स्टँड करणारा स्टंटमॅन अटकेत

Mumbai Viral Video : मद्यधुंद अवस्थेत असलेला कारचालक चक्क कारच्या दरवाजावर लटकून स्टंट, व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल

मुंबई :- अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरील ड्रॅगन फ्लायओव्हरजवळ हा व्यक्ती दारूच्या नशेत चालत्या कारच्या दारावर लटकून स्टंट करत होता. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. सूरज जमान साव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सूरज हा टुरिस्ट वाहन चालवतो. कूपर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी साव हा मद्यधुंद असल्याची पुष्टी केली आहे. तो फक्त स्टंट करत असल्याची कबुली त्याने पोलिसांसमोर दिली. साव हा कॅब ड्रायव्हर आहे. अंधेरी पूर्वेतील अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरील ड्रॅगन फ्लायओव्हरजवळ 30 जुलै रोजी रात्री 12.30 वाजता ही घटना घडली होती.

या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये हा व्यक्ती चालत्या कारमधून स्टंट करताना दिसत आहे. मात्र पुढे या कारने रस्त्याच्या कडेला पार्किंगला लावलेल्या गाड्यांना धडक दिली आहे.खिडकीवर लटकून स्टंट करतानाचा व्हिडिओ आरोपी कार चालवत असताना खिडकीवर लटकून आणि स्टेअरिंग ॲडजस्ट करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. कार झिगझेंग पद्धतीने पुढे जात होती. यामध्ये पार्किंगला लावलेल्या इतर गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी सांगितले की, सावने अंधेरीतील एका बारमध्ये त्याच्या मित्रांसोबत मद्यपान केले होते. नंतर, त्याने ही गाडी मालकाकडे घेऊन जात असताना स्टंट केला.

शेअर करा