मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Suicide News : वांद्रेतील 16 व्या मजल्यावरून अपंग महिलेची आत्महत्या; 3 महिन्यांत अशा 8 घटना

40 वर्षीय शीतल पवार यांचा मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Suicide News : वांद्रेतील 16 व्या मजल्यावरून अपंग महिलेची आत्महत्या; 3 महिन्यांत अशा 8 घटना

  • 40 वर्षीय शीतल पवार यांचा मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
  • मुंबई | वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीत एका अपंग महिलेने १६व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी दुपारी घडली. मृत महिलेचे नाव शीतल पवार (वय 40) असे असून, त्या त्यांच्या पतीसोबत त्या सदनिकेत राहत होत्या.काल (16 जुलै) दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास शीतल यांनी इमारतीच्या वरच्या मजल्यावरून खाली उडी घेतली. घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, त्या शारीरिकदृष्ट्या अक्षम (अपंग) असल्याने त्यांनी आत्महत्या कशी केली, याच्या विविध शक्यतांचा खेरवाडी पोलीस तपास करत आहेत.

    मृत शीतल पवार या चालू शकत नव्हत्या, त्यामुळे ही आत्महत्या नेमकी कोणत्या मानसिक किंवा कौटुंबिक कारणामुळे घडली, याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. यावेळी त्यांचे पती सतीश पवार (वय 45) हे घरीच होते. मात्र कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी खेरवाडी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

    मुंबईतील उंच इमारतींवरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. मागील तीन महिन्यांत ही अशा प्रकारची आठवी घटना असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शहरातील उंच इमारतींमध्ये सुरक्षाव्यवस्था व मानसिक आरोग्य जनजागृतीची गरज अधिक अधोरेखित होत आहे.

    हेही वाचा: Devendra Fadnavis : “त्रिभाषा सूत्र लागू करणारच!” – फडणवीसांचा स्पष्ट इशारा; ठाकरे बंधूंच्या भूमिकेवर टीकास्त्र

    शेअर करा