मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

मुंबई : राज्य सरकारचा निर्णय 13 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Mumbai IPS Transfer News : राजीव जैन यांची विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल इथे नियुक्ती ‌तर यशस्वी यादव यांची अप्पर पोलीस महासंचालक सायबर सेल येथे नियुक्ती

V
Vivek

1 मिनिट वाचन

मुंबई : राज्य सरकारचा निर्णय 13 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Mumbai IPS Transfer News : राजीव जैन यांची विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल इथे नियुक्ती ‌तर यशस्वी यादव यांची अप्पर पोलीस महासंचालक सायबर सेल येथे नियुक्ती

मुंबई :- राज्यात नवीन सरकार आल्यापासून प्रशासनात मोठ्या प्रमाणात बदल्यांचे आदेश निघाले. त्यानुसार आतापर्यंत अनेक वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. Mumbai IPS Transfer News त्यानंतर आता वरिष्ठ 13 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये मनोज कुमार शर्मा यांची राज्य कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यशस्वी यादव यांची अपर पोलीस महासंचालक सायबर सेल या विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने तेरा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे जीआर काढले आहे.

कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या?

1.मनोज कुमार शर्मां- विशेष पोलिस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था

2.आर बी डहाळे - विशेष पोलिस महानिरीक्षक, गुन्हे अभिलेख केंद्र

3.शोक मोराळे - विशेष पोलिस महानिरीक्षक, मोटार परिवहन विभाग

4.राजीव जैन - विशेष पोलिस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलिस बल

5.निखील गुप्ता - अपर पोलिस महसंचालक, कायदा आणि सुव्यवस्था.

6.सूरेश मेखला - अपर पोलिस महसंचालक, आर्थिक गुन्हे शाखा

7.यशस्वी यादव - अपर पोलिस महासंचालक, सायबर सेल

8.सुहास वारके - अपर पोलिस महासंचालक, कारागृह आणि सुधारसेवा

9.अश्वती दोर्जे - अपर पोलिस महासंचालक, महिला आणि बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग.

10.छेरिंग दोर्जे - अपर पोलिस महासंचालक, विशेष अभियान

11.के एम मल्लिकार्जुन - अपर पोलिस महासंचालक, प्रशासन

12.अभिषेक त्रिमुखे - अपर पोलिस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग

13.श्रेणिक लोढा - अपर पोलिस अधीक्षक, खामगाव बुलढाणा

शेअर करा