मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai South Lok Sabha Candidate : मुंबई दक्षिण-31 लोकसभा मतदारसंघात 14 अंतिम उमेदवार

Mumbai South Lok Sabha Candidate Name List : निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड यांची माहिती अरविंद सावंत आणि यामिनी जाधव यांचे उमेदवारी निश्चित

V
Vivek

2 मिनिट वाचन

Mumbai South Lok Sabha Election

Mumbai South Lok Sabha Candidate Name List : निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड यांची माहिती अरविंद सावंत आणि यामिनी जाधव यांचे उमेदवारी निश्चित

मुंबई :- मुंबई शहर जिल्ह्यातील ‘31- मुंबई दक्षिण’ Mumbai South Lok Sabha या लोकसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी काल 6 मे उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर अंतिम 14 उमेदवार आहेत, अशी माहिती मुंबई निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड यांनी दिली. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी 3 उमेदवारांनी माघार घेतली. या मतदारसंघात दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. Mumbai South Lok Sabha Live Update

4 मे 2024 रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात आली. ‘31-मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी छाननीत 17 उमेदवारांचे अर्ज वैध तर 4 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. या मतदारसंघासाठी 21 उमेदवारांनी 30 नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कटकधोंड यांनी दिली. Mumbai South Lok Sabha Live Update

मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील अंतिम उमेदवारांचे नाव, पक्ष व चिन्ह खालीलप्रमाणे

१) अरविंद गणपत सावंत - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)- मशाल

२) मोहम्मद शुऐब बशीर खतिब - बहुजन समाज पार्टी – हत्ती

३) यामिनी यशवंत जाधव- शिवसेना – धनुष्यबाण

४) अफजल शब्बीर अली दाऊदानी - वंचित बहुजन आघाडी – गॅस सिलिंडर

५) मो. नईम शेख - एम पॉलिटिकल पार्टी – बॅटरी टॉर्च

६) राहुल फणसवाडीकर - लोकशाही एकता पार्टी – शिवण यंत्र

७) सुभाष रमेश चिपळूणकर - राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी – कॅमेरा

८) अरविंद नारायण सावंत – अपक्ष – चिमणी

९) प्रशांत प्रकाश घाडगे – अपक्ष – एयर कंडीशनर

१०) मतीन अहमद नियाज अहमद रंगरेज - अपक्ष – बादली

११) मनिषा शिवराम गोहिल - अपक्ष - शिट्टी

१२) मोहम्मद महताब अख्तर हुस्सेन शेख – अपक्ष – खाट

१३) शंकर सोनवणे – अपक्ष – गॅस शेगडी

१४) सबीहा खान – अपक्ष – हिरा

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे

  • निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्दीची तारीख - 26 एप्रिल 2024
  • मतदानाची तारीख व वेळ - 20 मे 2024, सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत
  • मतमोजणीची तारीख - 04 जून 2024
  • निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख - 6 जून 2024
  • शेअर करा