मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचा हाहाकार; पश्चिम उपनगरांना झोडपले, लोकल उशिराने

Mumbai Rain Update Latest News : जोरदार पावसाची शक्यता; राज्यातील अनेक जिल्ह्यांना 'यलो' आणि 'ऑरेंज' अलर्ट

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचा हाहाकार; पश्चिम उपनगरांना झोडपले, लोकल उशिराने

Mumbai Rain Update Latest News : जोरदार पावसाची शक्यता; राज्यातील अनेक जिल्ह्यांना 'यलो' आणि 'ऑरेंज' अलर्ट

मुंबई :- मध्यरात्रीपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याने पुढील तीन ते चार तास मुंबईच्या काही भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली या भागात पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. Mumbai Rain Latest News

पावसाचा जोर कायम असला तरी, अद्याप सखल भागांत पाणी साचलेले नाही. मात्र, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल काही मिनिटे उशिराने धावत आहेत, ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, बीड, सोलापूर, जळगाव आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही आज पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी पुढील दोन दिवसांसाठी पावसाचा अंदाज दिला आहे. यामध्ये, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला असून, उर्वरित जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.

शेअर करा