मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Rain Update : मुंबईत महिन्याभराच्या विश्रांतीनंतर अवकाळी पावसाची अचानक हजेरी; दादर परिसरात सरी बरसल्याने नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा

• ऑक्टोबर हिटच्या चटक्यांमुळे मुंबईकर त्रस्त असतानाच सकाळीच पावसाचे आगमन; कामावर जाणाऱ्यांची उडाली तारांबळ.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Rain Update : मुंबईत महिन्याभराच्या विश्रांतीनंतर अवकाळी पावसाची अचानक हजेरी; दादर परिसरात सरी बरसल्याने नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा

•ऑक्टोबर हिटच्या चटक्यांमुळे मुंबईकर त्रस्त असतानाच सकाळीच पावसाचे आगमन; कामावर जाणाऱ्यांची उडाली तारांबळ.

मुंबई :- राज्यातील विविध भागांत पावसाने यापूर्वीच काढता पाय घेतला असून, पावसाच्या दीर्घ विश्रांतीमुळे अनेक ठिकाणी शेतकरी संकटात सापडले आहेत. हातातोंडाशी आलेली पिके करपल्याची उदाहरणे समोर येत आहेत. अशातच दुसरीकडे मुंबईकरांना मागील महिन्यापासून 'ऑक्टोबर हिट'चे तीव्र चटके सहन करावे लागत होते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा थेट 35 अंशाच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता, ज्यामुळे नागरिक प्रचंड उकाड्याने हैराण झाले होते.

अशा बिकट वातावरणात मुंबईतील दादर आणि परिसरामध्ये शुक्रवारी सकाळी अचानक पावसाने हजेरी लावली. महिन्याभराच्या मोठ्या विश्रांतीनंतर झालेल्या या पावसामुळे अचानक हवेत गारवा निर्माण झाला.

सकाळच्या सत्रात नागरिकांची उडाली तारांबळ; हवेत निर्माण झाला गारवा

सकाळच्या सुमारास अचानक दादर परिसरात पावसाच्या सरी कोसळल्यामुळे ऑफिस गाठणाऱ्या नोकरदार वर्गाची तसेच मॉर्निंग वॉक आणि जॉगिंगसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली. अनेक जण आडोसा शोधताना दिसले, तर काहींनी या अचानक आलेल्या पावसाचा आनंदही लुटला.

गेल्या काही दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे आणि उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना या छोट्याशा पावसामुळे तात्पुरता का होईना, पण मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काळात हवामानात आणखी काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: Vasai Crime News : वसईतील 'सम्राट ज्वेलर्स'मध्ये डल्ला मारणाऱ्या सराईत चोरांच्या मुसक्या आवळल्या!

शेअर करा