मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Police News : मुंबई पोलीस दलात पदोन्नतीचा उत्साह! नवीन वर्षाच्या दिनी 8 अंमलदारांचा 'स्टार' लावून सन्मान

• ठाकूर व्हिलेजमध्ये पार पडला दिमाखदार 'पिपिंग सेरेमनी'; पोलीस हवालदारांना मिळाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी बढती

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Police News : मुंबई पोलीस दलात पदोन्नतीचा उत्साह! नवीन वर्षाच्या दिनी 8 अंमलदारांचा 'स्टार' लावून सन्मान

•ठाकूर व्हिलेजमध्ये पार पडला दिमाखदार 'पिपिंग सेरेमनी'; पोलीस हवालदारांना मिळाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी बढती

मुंबई | मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार पदोन्नती मिळालेल्या पोलीस अंमलदारांच्या आयुष्यातील सुवर्णक्षण आज सत्या सभागृहात अनुभवता आला.1 जानेवारी 2026 रोजी, नवीन वर्षाचे स्वागत ड्युटीवर असतानाच पदोन्नतीचा आनंद साजरा करत करण्यात आले. कांदिवली (पूर्व) येथील ठाकूर व्हिलेजमधील सत्या सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात 8 पोलीस अंमलदारांना 'पोलीस हवालदार' पदावरून 'सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक' (ASI) पदावर बढती देण्यात आली.

छायाचित्रे · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶

खांद्यावर चमकले 'स्टार' आणि 'फित'

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या 30 डिसेंबर 2025 च्या आदेशानुसार या पदोन्नती जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार काल दुपारी 1.00 वाजता आयोजित 'पिपिंग सेरेमनी'मध्ये या आठही अंमलदारांच्या खांद्यावर मान्यवरांच्या हस्ते 'स्टार' आणि 'फित' लावून त्यांचा अधिकृत सन्मान करण्यात आला. पदोन्नती मिळालेल्या अंमलदारांच्या चेहऱ्यावर यावेळी सार्थ अभिमान आणि कृतज्ञतेचे भाव पाहायला मिळाले.

कर्तव्यनिष्ठेची मिळाली पोचपावती
वर्षांनुवर्षे मुंबईच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कष्ट उपसणाऱ्या या अंमलदारांच्या कर्तव्यनिष्ठेची दखल घेऊन ही पदोन्नती देण्यात आली आहे. या सोहळ्यावेळी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, सहकारी कर्मचारी आणि पदोन्नती मिळालेल्या अंमलदारांचे कुटुंबीय उपस्थित होते. नवीन वर्षाची सुरुवात अशा गौरवशाली सोहळ्याने झाल्याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा: Mumbai News : वरळीत धडक! आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातून महायुती फुंकणार प्रचाराचे रणशिंग; 'नारळ' फोडण्यासाठी मुद्दाम 'एनएससीआय'ची निवड

शेअर करा