मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Police News : मुंबई पोलिसांच्या खांद्यावर ‘स्टार’ झळकले! पदोन्नतीचा दिमाखदार सोहळा

• कर्तव्यनिष्ठेचा सन्मान!

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Police News : मुंबई पोलिसांच्या खांद्यावर ‘स्टार’ झळकले! पदोन्नतीचा दिमाखदार सोहळा

•कर्तव्यनिष्ठेचा सन्मान! पोलीस आयुक्त कार्यालयाने पाच अंमलदारांना दिले 'पदोन्नती'चे स्टार्स

मुंबई :- कर्तव्य आणि निष्ठेच्या बळावर मुंबई पोलिसांच्या खांद्यावर 'स्टार्स' झळकले. पोलीस दलातील 5 कर्तबगार अंमलदारांना पदोन्नती मिळाली असून, त्यांच्या सन्मानार्थ आज, दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी कांदिवली येथे एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 'पिपींग सेरेमनी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंमलदारांना नवीन पदचिन्हे लावून गौरवण्यात आले.

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आदेशानुसार, पोलीस शिपाई आणि पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेल्या 4 अंमलदारांना पोलीस हवालदारपदी बढती देण्यात आली. तर, पोलीस हवालदार पदावर सेवा बजावणाऱ्या एका अंमलदाराला सहायक पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर पदोन्नती मिळाली. सत्या सभागृहात आयोजित या सोहळ्यात, त्यांच्या खांद्यावर अभिमानाचे स्टार्स आणि फित लावून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

पोलीस दलात कर्तव्य बजावताना दाखवलेली सचोटी आणि कठोर परिश्रमामुळेच हा सन्मान मिळाल्याचे या अंमलदारांनी सांगितले. हा केवळ त्यांचाच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबाचाही गौरव असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या पदोन्नतीमुळे मुंबई पोलीस दलात सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले असून, इतर अंमलदारांनाही अधिक चांगल्या प्रकारे काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

हेही वाचा: Thane Crime News : ‘चरस’ तस्करीचा पर्दाफाश; ठाण्यात 3.40 कोटींचे ड्रग्ज जप्त

शेअर करा